शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची बस पुन्हा एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 18:03 IST

विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते...

ठळक मुद्देचालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलापीएमपी प्रशासनाचा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

पुणे : शहरात पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) च्या बसला आग लागण्याच्या घटनांचे सत्र थांबायला काय तयार नाही. मंगळवारी दुपारी सीएनजी बसने संचेती रुग्णालयाजवळील पुलावर अचानक पेट घेतल्याने त्यात ती पूर्णपणे जळून खाक झाली. ही घटना संचेती रुग्णालयाजवळील पुलावर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बस दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथून निघाली. या बसमध्ये सुमारे ३० ते ३५ प्रवासी होते. ही बस संचेती रुग्णालयाजवळील पुलावर आल्यानंतर पुढील बाजूने बसमधून अचानक धुर येऊ लागला. ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आले. त्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, चालकाने अग्निशमन दलाला याबाबत कळविले. अग्निशमन दलाची गाडी दाखल झाल्यानंतर आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत संपुर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे संपुर्ण बस जळून खाक झाली असून केवळ सांगाडा उरला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज पीएमपी प्रशासनाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल