शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी पीएमपीच्या १५१ बस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 23:52 IST

वाहतूककोंडी टाळण्यासाठी नियोजन, ११ ठिकाणी पार्किंगची सुविधा : अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज

पुणे : कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला येत्या १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे आवश्यक तयारी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सोईसाठी पुणे व शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बस सोडल्या जाणार आहेत. तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी पुणे-अहमदनगर रस्त्यावरील ३० किलोमीटरपर्यंतची वाहतूक वळविली जाणार आहे.

गेल्या वर्षी कोरेगाव भिमा येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ जानेवारी विजस्तंभ अभिवादनाचा कार्यक्रम शांततेत पार पडावा या दृष्टीने जिल्हा प्रशासनातर्फे काळजी घेतली जात आहे.तसेच विविध विभागांकडून आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.पालकमंत्री गिरीश बापट यांंच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.या बैठकीस सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबुराव पाचर्णे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त के व्यंकटेशम, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्योती कदम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे ७ ते १० लाख नागरिक येतील,असे गृहित धरून जिल्हा प्रशासनातर्फे सुरक्षेसह आवश्यक सोई-सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठकीत दिली.त्यामुळे पुण्यातून कोरेगाव भिमा येथे जाणा-या आणि नगर रस्त्याने येणा-या नागरिकांसाठी शिक्रापूर येथून पीएमपीच्या १५१ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यातील काही गाड्या शटल म्हणून वापरल्या जाणार आहेत. तसेच खासगी वाहनांसाठी ११ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे पीएमपी बसेससाठी पेरणे ग्रामपंचायतीने एक एकर जागा पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली आहे.शिरूर तालुक्यात ५ आणि हवेली तालुक्यात ६ ठिकाणी नागरिकांना पार्किगची सोय करण्यात आली असून येथे एक हजाराहून अधिक चारचाकी वाहाने बसू शकतात. .कोरेगाव भिमा येथे विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमास शासनाकडून २ कोटी देण्याचे मान्य केले आहे. निधीची कमतरता भासली तर जिल्हा नियोजन समितीतून दिला जाईल,असे पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले,तसेच विजयस्तंभाजवळ कायमस्वरूपी पाण्याची टाकी,हॉल आवश्यक बैठक व्यवस्था असावी यासंदर्भातील प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल,असेही बापट यांनी सांगितले.गेल्या २ महिन्यांपासून पेरणे फाटा, सणसवाडी, वढू, वाघोली, कोरेगाव-भीमा या भागांतील विविध संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांशी संपर्क साधून बैठकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात आला आहे. स्वच्छता,१०० पिण्याचे टँकर ,३६० फीरते शौचालये, विजयस्तंभ परिसराचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, वाहतूक, खाद्यपदार्थांचे दुकाने, वाहनतळ, सीसीटीव्ही कॅमेरे, अग्नीशमन यंत्रणा आदी बाबत काटेकोर नियोजन करण्यात आले आहे,असे नवल किशोर राम यांनी सांगितले.पोलीस प्रशासनाने मागील वर्षा झालेली दंगल लक्षात घेवून गेल्या वर्षापेक्षा दहा पटीने पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. त्यानुसार ५ हजार पोलीस १२ हजार होमगार्ड,एसआरपीएफच्या १२ तुकड्या आणि ४०० स्वयंसेवक यांच्या मदतीने कायदा सुव्यवस्था राखली जाणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेPMPMLपीएमपीएमएल