शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

PMPML| बस ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी पीएमपी ‘गुगल’सोबत करणार करार

By नितीश गोवंडे | Updated: September 21, 2022 21:10 IST

पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली...

पुणे : पीएमपीला होणारी तूट पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांकडून मिळावी यासाठी आर्थिक ताळेबंदीचा प्रस्ताव प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला संचालक मंडळाकडून मान्यता मिळाली असून, त्यानुसार दोन्ही महापालिका ६०-४० या धोरणानुसार पीएमपीला संचलन सूट देणार आहेत. मंगळवारी (२० सप्टेंबर) पीएमपीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत या निर्णयासह काही विषय देखील मंजूर करण्यात आले.

पीएमपीला सध्या ७१८ कोटींची तूट होत आहे. यामुळे दोन्ही महापालिकांनी ही तूट भरून काढण्यासाठी आर्थिक ताळेबंदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यासह पीएमपीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांप्रकरणी देखील धोरण प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या प्रस्तावाला देखील मान्यता मिळाली असून, अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी तर चालक-वाहकांची पाच वर्षांनी आता बदली होणार आहे. या संचालक मंडळाच्या बैठकीवेळी दोन्ही महापालिकांचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पीएमपीच्या सह व्यवस्थापकीय संचालिका डॉ. चेतना केरूरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अखेर ‘गुगल’सोबत करार होणार..शहरात संचलनात असलेल्या पीएमपीचे ट्रॅकिंग व्यवस्थित होण्यासाठी आणि सगळ्या बसचे लाईव्ह लोकेशन पीएमपीच्या कंट्रोल रूमला मिळावे या हेतूने ‘गुगल’सोबत करार करण्यासंबंधी देखील पीएमपी प्रशासनाने प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला देखील संचालक मंडळाने मंगळवारच्या बैठकीत मान्यता दिली असून, लवकरच पीएमपीचे लाईव्ह ट्रॅकिंग सुरू होण्यास मदत मिळणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलgoogleगुगल