पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी १० ते १४ डिसेंबरदरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथून विशेष बस सोडण्यात येणार आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी जाणाऱ्या श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी ‘पीएमपी’कडून जादा तिकीट दर आकारला जाणार आहे. १० ते १२ आणि १४ डिसेबरला रात्री साडेदहा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटतील. तर, १३ डिसेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता मुकुंदनगर येथून बस सुटणार आहेत. या बससेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन ‘पीएमपी’कडून करण्यात आले आहे.
असे आहेत विशेष बसचे मार्ग
मुकुंदनगर ते निगडी भक्ती-शक्ती : दांडेकर पूल, डेक्कन, वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन
मुकुंदनगर ते धायरी मारुती मंदिर : दांडेकर पूल, विठ्ठलवाडी, आनंदनगर, वडगाव फाटा, धायरी गाव
मुकुंदनगर ते कोथरूड डेपो : टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनीमुकुंदनगर ते वारजे माळवाडी : डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर
Web Summary : Pune Mahanagar Parivahan Mahamandal (PMP) will run special night buses from Mukundnagar during the Sawai Gandharva festival (Dec 10-14). Extra fares will be charged. Buses depart Mukundnagar at 10:30 PM (Dec 10-12, 14) and 12:30 AM (Dec 13) on specified routes.
Web Summary : पुणे महानगर परिवहन महामंडल (पीएमपी) सवाई गंधर्व महोत्सव (10-14 दिसंबर) के दौरान मुकुंदनगर से विशेष रात्रि बसें चलाएगा। अतिरिक्त किराया लिया जाएगा। बसें मुकुंदनगर से रात 10:30 बजे (10-12, 14 दिसंबर) और रात 12:30 बजे (13 दिसंबर) को विशिष्ट मार्गों पर रवाना होंगी।