शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

पीएमपी म्हणते, जीएसटी देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 13:04 IST

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएनजीच्या बिलावर जीएसटी देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे.

ठळक मुद्देसीएनजी थकित बिलातून १० कोटी वजा करण्याची विनंती : एमएनजीएलला पत्र पीएमपीच्या ताफ्यात जवळपास ११०० बस सीएनजीवर धावतात १० कोटी रुपयांचा तिढा सध्यातरी सुटण्याची शक्यता कमी

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) या कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या सीएनजीच्या बिलावर वस्तु व सेवा कर (जीएसटी) देण्यास पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) नकार दिला आहे. आगारांपर्यंत गॅस पाईपलाईन असल्याने आम्हाला जीएसटी लागु होत नसल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. ही रक्कम जवळपास दहा कोटी रुपयांची आहे.पीएमपीच्या ताफ्यात जवळपास ११०० बस सीएनजीवर धावणाऱ्या आहेत. या गाड्यांना एमएनजीएलकडून गॅस पुरवठा केला जातो. त्यासाठी पीएमपीच्या आगारांपर्यंत पाईललाईनद्वारे गॅस पोहचविण्यात आलेला आहे. दररोज पीएमपीला ६० ते ६५ हजार किलो गॅसची गरज पडते. सीएनजीचा प्रति किलोचा दर ५५ रुपये एवढा आहे. पीएमपीने गॅस स्टेशनसाठी जागा उपलब्ध करून दिल्याने कंपनीकडून प्रतिकिलो १ रुपये २० पैसे सवलत दिली जाते. त्यानुसार पीएमपीला ५३ रुपये ८० पैसे या दराने सीएनजी मिळतो. एमएनजीएलकडून या दरानेच दर दहा दिवसांचे बील काढण्यात येते. मात्र, पीएमपी प्रशासनाकडून प्रत्येकवेळी पुर्ण बिल दिले जात नाही. त्यामुळे थकबाकी सातत्याने वाढत चालली आहे. संपुर्ण देशात दि. १ जुलै २०१७ रोजी जीएसटी लागु झाल्यानंतर एमएनजीएलकडूनही गॅस पुरवठ्यावर जीएसटी लावण्यास सुरूवात केली. मात्र, पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी त्यावेळी पीएमपीला जीएसटी लागु होत नसल्याने जीएसटीचे वाढीव पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर पीएमपीने आजअखेरपर्यंत एकदाही जीएसटीचे पैसे कंपनीला दिलेले नाहीत. जुलै २०१७ ते नोव्हेंबर २०१८ अखेरपर्यंत पीएमपीकडे एमएनजीएलचे सुमारे ३७ कोटी ३६ लाख रुपये थकले आहेत. त्यापैकी सुमारे १० कोटी रुपये जीएसटीचे आहेत. थकित रक्कम देण्याबाबत कंपनीकडे पीएमपीकडे तगादा लावला जात आहे. तर पीएमपीकडून मात्र मुंढे यांनी घेतलेला निर्णय पुढे करून ही रक्कम देण्यास नकार दिला जात आहे. पीएमपीच्या आगारांमध्ये थेट पाईपलाईद्वारे गॅस पुरवठा होतो. पुरवठ्यासाठी स्वतंत्र यंत्रणा लागत नाही. त्यामुळे जीएसटी आम्हाला लागु होत नाही, असा पीएमपीचा दावा आहे.--------------पीएमपी प्रशासनाने जीएसटीची रक्कम न घेण्याबाबत पीएमपी प्रशासनाने एमएनजीएलला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये जीएसटीचे १० कोटी रुपये न घेण्याची विनंती केली आहे. तर जीएसटी सर्वांनाच लागु असल्याचे एमएनजीएलचे म्हणणे आहे. त्यामुळे १० कोटी रुपयांचा तिढा सध्यातरी सुटण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलGSTजीएसटी