शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

डिझेल दरवाढीचा पीएमपीला भुर्दंड : महिनाभरात सव्वा सहा रुपये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 20:36 IST

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ८०० बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत.

ठळक मुद्देदैनंदिन खर्चात अडीच लाखांची भरपीएमपीला काहीशा कमी दराने इंधन कंपनीकडून डिझेलचा पुरवठा

पुणे : दररोजचा खर्च भागविता भागविता नाकीनऊ येत असताना पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) डिझेल दरवाढीने जेरीस आणले आहे. मागील महिनाभरात डिझेलच्या दरात सव्वा सहा रुपयांची वाढ झाल्याने इंधनाचा दैनंदिन खर्च अडीच लाख रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे पीएमपीला खर्च भागविताना मोठी कसरत करावी लागत असल्याची स्थिती आहे. दररोज वाढणारे इंधन दर आता पीएमपीला परवडणारे नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे ८०० बस डिझेलवर चालणाऱ्या आहेत. तर जवळपास ६०० बस सीएनजीवर धावतात. आॅगस्ट महिन्यानंतर सीएनजीच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. मात्र डिझेल दरवाढीचा फटका पीएमपीला बसत आहे. डिझेलवरील बसला दररोज सुमारे ४० हजार लिटरची गरज असते. पीएमपीला काहीशा कमी दराने इंधन कंपनीकडून डिझेलचा पुरवठा होतो. सोमवारी (दि. १) हा दर प्रति लिटर ७५ रुपये होता. या दरानुसार पीएमपीचा डिझेलवरील दैनंदिन खर्च ३० लाखांवर गेला आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी पीएमपीला ६८.७५ रुपये प्रतीलिटर दराने डिझेल उपलब्ध होत होते. महिनाभरात सव्वा सहा रुपयांनी दरवाढ झाली आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर अखेरपर्यंत दैनंदिन खर्चात अडीच लाख रुपयांची भर पडली आहे. इंधन कंपनीकडून पीएमपीसाठी दर पंधरा दिवसांनी दर निश्चित केले जातात. त्यानुसार ३१ आॅगस्टला ६८.७५ रुपये हा दर होता. त्यामध्ये दि. १ सप्टेंबर रोजी १ रुपये ६० पैशाने तर १६ सप्टेंबरला ३ रुपये ४५ पैसे आणि १ आॅक्टोबरला १ रुपये १९ पैशाने वाढ करण्यात आली. एकाच महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात डिझेल दरात वाढ होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच आतापर्यंत पीएमपीने एवढ्या महागाईचे इंधन कधीही खरेदी केलेले नव्हते. सीएनजीच्या दरातही आॅगस्ट महिन्यात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. पीएमपीला सध्या प्रति किलो ५० रुपयांनी सीएनजीचा पुरवठा होता. त्यासाठी दररोज २० लाख रुपये मोजावे लागत आहेत. केवळ इंधनावरील दैनंदिन खर्च सुमारे ५० लाखांच्या घरात पोहचला आहे. त्यामुळे इंधनावरील हा खर्च पीएमपीचे कंबरडे मोडणारा ठरत आहे. --------------------- इंधनावरील दैनंदिन खर्च (अंदाजे)बस                     इंधन गरज                   खर्चडिझेल ८००     ४० हजार लिटर                  ३० लाख रुपयेसीएनजी ६००    ३८ ते ४० हजार किलो       २० लाख रुपयेमागील महिनाभरातील डिझेल दरातील वाढदि. १ सप्टेंबर - १ रुपये ६० पैसे दि. १६ सप्टेंबर  - ३ रुपये ४५ पैसे दि. १ आॅक्टोबर - १ रुपये १९ पैसे 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलDieselडिझेल