शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्या काळातही होती पीएमपीत अनियमितता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 20:53 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातही भांडार विभागात अनियमितता झाली होती.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातही भांडार विभागात अनियमितता झाली होती. त्यामुळे या विभागाचे त्यांच्या काळातील खरेदीचेही ऑडिट केले जात आहे. प्राथमिक तपासात कमी किंमतीचे सुट्टे भाग वाढीव किंमतीने खरेदी करणे, गरज नसताना सुट्टे भागांची खरेदी करणे, विक्रेत्यांना वाढीव रक्कम देण्याचे प्रकार समोर येत आहेत. पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून मुंढे यांची मार्च २०१७ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. पण वर्ष पुर्ण होण्याआधीच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांची बदली झाली. मुंढे यांनी आपल्या लौकिकाला साजेशी सुरूवात करून पीएमपीमध्ये शिस्त आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्यानुसार त्यांनी अनेक बेशिस्त कर्मचारी व अधिकाºयांवर कारवाईचा बडगा उगारला. कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांची त्यांनी कधीच गय केली नाही. असे असतानाही भांडार विभागामध्ये मात्र काही कर्मचाऱ्यांकडून सुट्टे भागांच्या खरेदीत घोळ केला जात होता. पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याला दुजोरा दिला आहे.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडार विभागामध्ये अनियमितता असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले. मुंढे यांच्या काळातही अशी अनियमितता झाली आहे. त्यामुळे २०१७ पासून आतापर्यंतचे ऑडिट करण्यात आले आहे. या ऑडिटपूर्वी येथील दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत. तपासामध्ये सुट्टे भागांची गरज नसताना खरेदी करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच जादा दराने खरेदी, विक्रेत्याला खरेदीपेक्षा जास्त पैसे देणे असे प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे आणखी खोलवर तपासणी केली जाऊ शकते. सुट्टे भागांची गरज नसताना होत असलेली खरेदी रोखण्यासाठी भांडार विभागाचे संगणकीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनियमितता टाळता येणार आहे.---------

टॅग्स :Puneपुणेtukaram mundheतुकाराम मुंढेPMPMLपीएमपीएमएल