शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची एका दिवसात जवळपास १ कोटी ९० लाखांची विक्रमी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 21:42 IST

मागील काही वर्षांपासून कमी उत्पन्नामध्ये आर्थिक अडचणी सापडलेल्या पीएमपीला दिलासा

ठळक मुद्दे‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न सध्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या जवळपास सोमवारी पीएमपीच्या सुमारे १५५० बस मार्गावर बस रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न

पुणे : मागील काही वर्षांपासून कमी उत्पन्नामध्ये आर्थिक अडचणी सापडलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ला सोमवारी (दि. ७) विक्रमी कमाईमुळे काहीसा दिलासा मिळाला. पीएमपीला सोमवारी एका दिवसात तब्बल १ कोटी ९० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. मागील पाच वर्षात पहिल्यांदाच विक्रमी उत्पन्न मिळाल्याने ‘पीएमपी’साठी नवीन वर्षातील पहिला सोमवार दिलासादायक ठरला.मागील काही वर्षांपासून जुन्या झालेल्या बस, ब्रेकडाऊन अशा विविध कारणांमुळे पीएमपीच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे तोट्यामध्ये वर्षागणिक वाढ होत आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या पीएमपीला सातत्याने पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडे मदतीसाठी हात पसरावे लागतात. काहीवेळा कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठीही प्रशासनाकडे पुरेसे पैसे नसतात. ईलेक्ट्रिक बससह नवीन सीएनजी बस आल्यानंतर काही प्रमाणात ही स्थिती बदलू लागली आहे. दैनंदिन उत्पन्न १ कोटी ६० लाखांच्या जवळपास पोहचले आहे. उत्पन्न वाढीसाठी महामंडळाच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाहक-चालकांसाठी प्रोत्साहन योजना, ब्रेकडाऊन कमी करण्याचे प्रयत्न, तिकीट तपासणी, बस वेळेत मार्गस्थ करण्याबाबत संबंधितांना सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम सध्या जाणवू लागले आहेत.

‘पीएमपी’चे दैनंदिन उत्पन्न सध्या १ कोटी ६० लाख रुपयांच्या जवळपास असते. तर मार्गावर जवळपास दीड हजार बस धावतात. सोमवारी नवीन वर्षातील पहिल्या सोमवारी ‘पीएमपी’ला पहिला सुखद धक्का बसला. ‘पीएमपी’चे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष डॉ. श्रीकर परदेशी यांच्या कार्यकाळात जानेवारी २०१५ मध्ये पहिल्या आठवड्यात एका दिवसातील उत्पन्न तब्बल २ कोटी ५ लाख रुपये एवढे होते. त्यानंतर आतापर्यंत एकदाही पीएमपीला या उत्पन्नाच्या जवळपास जाता आले नाही. यापार्श्वभुमीवर सोमवारी १ कोटी ९० लाख रुपयांचा टप्पा पार केल्याने अधिकारी व कर्मचाºयांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे. --------------

‘ख्रिसमस’च्या सुट्टया संपल्यानंतर बहुतेक शाळा काही दिवसांपुर्वी सुरू झाल्या आहेत. सुट्यानंतरचा पहिला सोमवार असल्याने नोकरदार, कामगार, विद्यार्थ्यांनी पास काढण्यासाठी गर्दी केली होती. यादिवशी पासचे उत्पन्न जवळपास ५० लाख रुपये मिळाले आहे. तर १ कोटी ४० लाख रुपये केवळ तिकीट विक्रीतून मिळाले असल्याने प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. यापुर्वी जानेवारी २०१५ वगळता केवळ रक्षाबंधन या सणादिवशी पीएमपीचे उत्पन्न काही वेळा १ कोटी ८० लाखांच्या पुढे जात होते.............................

सोमवारी पीएमपीच्या सुमारे १५५० बस मार्गावर होत्या. सुट्टया संपल्याने पासला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच प्रवाशांची संख्या वाढल्याचे दिसून आले. बस रद्द होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आगारांची अचानक तपासणी करून कामातील अनियमितता दुर केली जात आहे. ब्रोकन पध्दतीला प्रतिसाद मिळतोय. या सर्वाच्या एकत्रित परिणामुळे उत्पन्नात वाढ झाली.- अनंत वाघमारे, वाहतुक व्यवस्थापक, पीएमपी 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे