शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

PMPML: पीएमपी चालकच विचारतात, 'पॅनिक बटण' म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 10:15 IST

महिलांची सुरक्षा रामभराेसे : ‘लोकमत’ने केलेल्या ‘पीएमपी’मधील पाहणीतून स्पष्ट

मानसी जोशी/किमया बोराळकर 

पुणे : महिलांना सुरक्षित वाटावे, अनुचित प्रकार घडू नये यासाठी बसमध्ये पॅनिक बटण बसवले जाते. प्रत्यक्षात हे बटण कार्यरतच नाहीत. धक्कादायक म्हणजे पीएमपी वाहन चालकांनाच याची माहिती नसल्याचे समोर आले आहे.  प्रवाशांना स्वस्त, सुलभ आणि सुरक्षित प्रवाससेवा देण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल) कटिबद्ध आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने विविध उपाययाेजना केल्याही, मात्र प्रत्यक्षात त्या नावालाच असल्याचे ‘लाेकमत’च्या पाहणीतून आढळून आले आहे.

बटण फक्त शाेसाठी

प्रवासी महिलांना असुरक्षित वाटल्यास, सहप्रवाशांकडून कोणतेही गैरकृत्य होत असल्यास त्यांच्या मदतीसाठी ‘पॅनिक बटण’चा वापर करता येईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात येते. बटण दाबताच त्याची माहिती चालकाला मिळेल आणि तो बस थांबवेल, असा या पॅनिक बटणामागचा तर्क होता. मुळात हे पॅनिक बटणच फक्त शोसाठी असल्याचे दिसून आले आहे.

वास्तव काय?

- मुळात पीएमपीमधून प्रवास करणाऱ्या अनेक महिला, मुलींना या बटणासंदर्भात कोणतीही माहितीच नाही. त्यामुळे या बटनाचा वापर झालेला दिसत नाही.- विशेष म्हणजे या पॅनिक बटणाचा उपयोग कशासाठी आहे, हे पीएमपीच्या चालक, वाहकालाही माहीत नसल्याचे समोर आले आहे.- रात्री लांबच्या पल्ल्याचा प्रवास करताना महिला घाबरतात किंवा प्रवासाआधी दहा वेळा विचार करून मगच बाहेर पडतात. सुरक्षेच्या उपाययोजना नावालाच असतील तर महिलांनी नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

''प्रत्येक पीएमपीमध्ये कॅमेरे असावेत. एका बसमध्ये मोजक्या संख्येने प्रवासी येऊ द्यावेत. जेणेकरून गर्दी जेवढी कमी राहील, तेवढे गैरकृत्यांचे प्रमाण थांबतील. पीएमपी प्रशासनाने हेल्पलाइनबद्दल महिलांना संपूर्ण माहिती द्यावी. महिलांसाठीच्या सुविधांची जाहिरात बसमध्येच केली तर अधिक फायदेशीर ठरेल. - अर्चना पुराणिक, प्रवासी''

''महिलांची सुरक्षा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. मी एक नर्स आहे. रात्री-अपरात्री मला प्रवास करताना अजिबात सुरक्षित वाटत नाही. प्रशासनाने महिलांना ज्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत, त्याविषयी काही माहिती आम्हाला नाही. ती माहिती प्रशासनाने महिलांपर्यंत पोहोचवली तर आम्हाला फायदा होऊ शकतो.  - मेघना कांबळे, प्रवासी'' 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलBus DriverबसचालकWomenमहिलाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका