शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कात्रज चौकात पीएमपी बस ‘विना चालक’ धावली पण...दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 17:49 IST

जेवणाची वेळ असल्यामुळे चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला...

ठळक मुद्देबेजबाबदारपणे बस सुरू ठेवून गेल्याबद्दल चालक तत्काळ निलंबित

धनकवडी : कात्रज  चौकातील बस थांब्यावर थांबलेली बस विना चालक पुढे अचानक सुरु झाली. मात्र, ही बस इंडीका गाडीला धडकून थांबल्यामुळे थोडक्यात मोठी दुर्घटना टळली. दुपारी बस थांब्यावर बस सुरूच ठेवून गेलेला चालक दिगंबर खोत याला पीएमपी प्रशासनाकडून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिवाजीनगरवरुन एक फेरी पूर्ण करून कात्रज स्थानकामध्ये आलेला चालक खोत पुन्हा शिवाजीनगरकडे जाण्यासाठी बसथांब्यावर आला होता. दुपारी साडेबारा वाजता त्याला पुन्हा शिवाजीनगरची फेरी करावयाची होती. जेवणाची वेळ असल्यामुळे  चालक बस बंद न करता सुरू ठेवत जेवण करण्यासाठी निघून गेला. बस नुकतीच थांब्यावर आल्यामुळे बसमध्ये प्रवाशी नव्हते. बस सुरू असल्यामुळे उताराने पुढे जावू लागली. त्याचवेळी स्वारगेटकडे जाणारा सिग्नल सुटला. स्वारगेटसह  बाह्यवळण मार्गाने नवले उड्डाणपुलाच्या दिशेने वाहने जावू लागली. उताराने येणारी बस एका इंडिका गाडीला धडकून थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेने कात्रजच्या चौकात एकच गोंधळ उडाला. वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. भेदरलेला इंडिका चालक गणेश माळी सुदैवाने बचावला. हिंजवडीकडे निघालेला गणेश सिग्नल मिळाल्यामुळे वळला आणि बस येवून आदळली. दरम्यान कात्रज आगार प्रमुख सतीश चव्हाण यांनी माहिती घेवून चालक खोत याला बेजबाबदारपणे बस सुरू ठेवून गेल्याबद्दल तत्काळ निलंबित केले.

टॅग्स :Puneपुणेkatrajकात्रजDhankawadiधनकवडीPMPMLपीएमपीएमएलAccidentअपघात