गणेशखिंड रस्त्यावर पीएमपी बस पेटली
By Admin | Updated: January 12, 2017 03:07 IST2017-01-12T03:07:26+5:302017-01-12T03:07:26+5:30
प्रवाशांना घेऊन जातानाच पीएमपी बसने अचानक पेट घेतल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावरच्या

गणेशखिंड रस्त्यावर पीएमपी बस पेटली
पुणे : प्रवाशांना घेऊन जातानाच पीएमपी बसने अचानक पेट घेतल्याची घटना गणेशखिंड रस्त्यावरच्या ई-स्क्वेअर सिनेमागृहासमोर रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली.
ही बस खडकी बाजारकडून पुणे महापालिकेच्या दिशेने जात होती. गणेशखिंड थांब्यावर बस थांबली असता इंजिनामधून अचानक स्फोट झाला. काही क्षणातच बस पेटली. चालक आणि वाहकाने प्रसंगावधान राखत बस थांबवत दहा प्रवाशांना तत्काळ खाली उतरवले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. दरम्यान, रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली होती.