शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गरोदर महिलांच्या मदतीला धावून आले पीएमपीचे चालक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 13:50 IST

गाडी थांबवून दवाखान्यापर्यंत पोहचवले

ठळक मुद्देपीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठीच आहे व दोन्ही बसच्या चालकवाहकांनी आपले कर्तव्य पूर्ण केले

पुणे: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस, वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ही मंडळी जीव धोक्यात घालून कर्तव्य पूर्णतेसाठी झटत आहे. त्यात पीएमपीएलने देखील अत्यावश्यक सेवेसाठी बसेस उपलब्ध करुन देत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी महत्वपूर्ण योगदान देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सोमवारी पुण्यात पौड फाटा व पाषाण याठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये पीएमपीच्या चालकांनी रस्त्यावर वाहनाची वाट पाहत थांबलेल्या गरोदर महिलांसाठी गाडी थांबवून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात पोहचवण्यास मदत केली. संबधित महिलांच्या नातेवाईकांनी बसचालकांना धन्यवाद दिले.सोमवारी  स्वारगेट आगाराकङील अत्यावश्यक सेवेतील नांदेड सिटी ते डेक्कन व्हाया कर्वेनगर या मार्गावर वाहक श्री मासुळे व चालक श्री. भोसले हे बस क्रमांक.७१८ बस घेऊन जात होते. पौडफाटा येथे बस आल्यावर त्यांना गर्दी दिसली. मंजु श्रवण गुजर या गरोदर महिलेला घेऊन तिचे नातेवाईक वाहनाची वाट पवहात होते. मात्र कोरोना संचारबंदीमुळे त्यांना एकही वाहन रस्त्यावर दिसले नाही. त्यांनी बसला हात केला व दवाखान्यात नेण्याची विनंती केली. चालकवाहकांनी लगेचच त्यांना  केईएम हाँस्पीटल रास्ता पेठ येथे नेले व त्यानंतर पुढील फेºया पुर्ण केल्या.बाणेर फाटा येथेही असाच प्रकार झाला. बालेवाडी आगारातील वाहक परमेश्वर वामनराव पाटील व चालक.तानाजी अर्जुन देडे हे  म्हाळूंगे ते महापालिका या मार्गावर बस घेऊन जात असताना त्यांना बाणेर फाटा रस्त्यावर गर्दी दिसली. ते सर्वजण एका महिलेला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी थांबले होते व वाहन मिळत नसल्याने त्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी बसलाच हात दाखवून थांबवले.  त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर चालक व वाहकांनी लगेचच नातेवाईकांसह त्या महिलेला (शिखा शैलेश कुमार) बसमध्ये बसवले व बस  बोरसे नर्सिंग होम, कोथरूड या दवाखान्यात आणली. तिथे त्या महिलेला दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपल्या पुढील फेºया पुर्ण केल्या.पीएमपीएल प्रवाशांच्या सेवेसाठीच आहे व दोन्ही बसच्या चालकवाहकांनी आपले कर्तव्य पूर्ण केले याचा संपूर्ण पीएमपीएल व्यवस्थापनाला अभिमान आहे, असे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलpregnant womanगर्भवती महिलाWomenमहिलाBus Driverबसचालक