शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

पीएमपी प्रशासनाने घेतला दुर्घटनांचा धसका ; बस तपासणीच्या कामाला सुरवात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 11:50 IST

त्येक एक ते दीड महिन्याला पीएमपीची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही.

ठळक मुद्देप्रत्येक आगारात स्वतंत्र समिती दररोज किमान १५० बस बंद; ४५०० ते ५ हजार बस फेऱ्या कराव्या लागतात रद्द

पुणे : बसला सातत्याने आग लागणे, ब्रेकडाऊन होण्याचे प्रकार घडत असल्याने पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)ने बसचे ऑडिट करण्यास सुरूवात केली आहे. त्यासाठी प्रत्येक आगारात पाच अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती दररोज बसची तपासणी करत आहे. त्यामुळे या घटना भविष्यात कमी होतील, अशा आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. पीएमपी च्या ताफ्यात दोन हजारांहून अधिक बस आहेत. त्यापैकी सुमारे १४०० बस पीएमपीच्या मालकीच्या तर उर्वरीत बस ठेकेदारांकडील आहेत. प्रत्येक एक ते दीड महिन्याला पीएमपीची एक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपीकडून यापुर्वी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. तसेच ब्रेकडाऊनचे प्रमाणही अद्याप कमी झालेले नाही. दररोज किमान १५० बस बंद पडत आहेत. त्यामुळे दररोज ४५०० ते ५ हजार बस फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. तसेच आरटीओकडूनही अनफिट बसवर कारवाई सुरू केली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पीएमपी प्रशासनाने सर्व १३ आगारात एकुण पाच अधिकारी व अभियंत्यांची टीम तयार केली आहे. त्यांच्याकडून प्रत्येक आगारातील बसची टप्प्याटप्याने पाहणी केली जात आहे. त्यासाठी त्यांना प्रशासनाकडून कोणत्या बाबी तपासयाच्या याची यादीच दिली आहे. त्यानुसार प्रत्येक बसमधील या बाबी तपासण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये वायरींग व इंजिनशी संबंधित सर्व बाबी तपासल्या जात आहेत. तसेच ब्रेक, क्लच, गिअर बॉक्स, आसनांसह इतर आवश्यक गोष्टींचेही ऑडिट केले जात आहेत. चालकांकडून करण्यात आलेल्या तक्रारींच्या आधारेही बसची तपासणी केली जात आहे. त्यानुसार आवश्यक सुटे भाग बदलले जात आहेत. हे ऑडिट टप्प्याटप्याने केले जात आहे. त्यामुळे बसला आग लागणे किंवा ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण कमी होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. -----------प्रत्येक आगारात एक स्वतंत्र समिती आहे. तसेच सर्व समित्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक स्वतंत्र समितीही आहे. ही समिती प्रत्येक आगाराचा आढावा घेत आहे. त्यानुसार तपासणी करून कोणते भाग बदलायचे, दुरूस्त करायचे याचा निर्णय समिती घेत आहे.- नयना गुंडे, अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडेAccidentअपघातfireआग