शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

आचारसंहितेचा महापालिकेच्या विकास कामांनाही बसणार फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 6:50 PM

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू : शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई 

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी १० मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. महापालिकेच्या अखत्यारीतील विकासकामांना या आचारसंहितेचा फटका बसणार आहे. ज्या ठेकेदारांना १० मार्चपूर्वी वर्क ऑर्डर दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम सुरु झालेले नाही अशी कामे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सुरु करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विभागांना दिले आहेत. तसेच जी कामे १० मार्चपूर्वी चालू झाली आहेत, ती कामे सुरु ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. यासोबतच शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सर्व शासकीय कार्यालये आणि आवारातील सर्व कार्यालयीन इमारतींच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पत्रके, कट आऊट, होर्डिंग्स, बॅनर्स, झेंडे आदी निवडणुका जाहीर झाल्यानंतर २४ तासांमध्ये काढून टाकण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी, असेही नमूद करण्यात आले आहे. शासकीय संपत्तीचे विद्रुपीकरण व सार्वजनिक जागेचा गैरवापर करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जावी. सार्वजनिक मालमत्तांच्या भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, पेपर, कटआऊट, होर्डींग्ज, बॅनर्स, झेंडे आदी लावणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच रेल्वे स्टेशन, बसस्टॉप, विमानतळ, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बसेस, इलेट्रीक रन, इलेक्ट्रक/टेलीफोन, खांब, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इमारती येथील अनाधिकृत राजकीय जाहिराती निवडणूका जाहिर झाल्यापासून ४८ तासात काढून टाकण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी. तसेच खासगी मालमत्तांवरील सर्व अनधिकृत राजकीय जाहिराती, निवडणुका जाहीर झाल्यापासून ७२ तासांमध्ये काढून टाकण्याच्याही सुचना दिलेल्या आहेत. 

टॅग्स :PuneपुणेElectionनिवडणूकPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliticsराजकारण