PMC: श्वानांच्या नसबंदीत महापालिका नापास; संख्या कमी होण्यापेक्षा वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 20:25 IST2023-07-12T20:22:23+5:302023-07-12T20:25:01+5:30
नसबंदी करण्यापेक्षा फक्त रेस्क्यू ऑपरेशनचा दिखावा करताना कर्मचारी दिसत आहेत...

PMC: श्वानांच्या नसबंदीत महापालिका नापास; संख्या कमी होण्यापेक्षा वाढली
पुणे : महापालिकेकडून श्वानांच्या नसबंदीसाठी दरवर्षी कोट्यावधी रुपयांची निविदा काढण्यात येते. प्रत्यक्षात मात्र श्वानांची नसबंदीच केली जात नसल्याचे आणि या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे ॲनिमल रेस्क्यू ट्रस्ट संस्थेच्या विनीता टंडन यांनी सांगितले.
महापालिकेकडून सतत चुकीच्या पद्धतीने श्वानांना पकडली जात आहेत. त्यांची नसबंदी केली जात नाही. त्यामुळे त्यांची संख्या कमी होण्यापेक्षा वाढताना दिसून येत आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. संबंधित विभागाकडून कोणत्याही प्रकारे उत्तर दिले जात नाही. नसबंदी करण्यापेक्षा फक्त रेस्क्यू ऑपरेशनचा दिखावा करताना कर्मचारी दिसत आहेत. केंद्र सरकारच्या ॲनिमल नसबंदी कायद्याची अंमलबजावणी करावी तसेच महापालिकेने वाॅर्डनिहाय कमिटी स्थापन करावी. नागरिकांच्या समस्यांचे निवारण करावे आणि केंद्र सरकारच्या नियमांनुसार कार्यवाही करावी, अशी मागणी विनीता टंडन यांनी केली.