पुणे - लोहगाव, विमाननगर, वाघोलीचा विकास केवळ घोषणांपुरता न राहता प्रत्यक्ष कामातून दिसला पाहिजे, हा माझा ठाम संकल्प आहे. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व शिक्षण हे माझ्या प्राधान्यक्रमातील मूलभूत विषय असतील. महिलांसाठी रोजगाराच्या संधी, युवकांसाठी कौशल्य विकास, स्वच्छ व सुंदर परिसर तसेच प्रत्येक कुटुंबापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक ०३ मधील उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी केले.पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी लोहगाव, विमाननगर आणि वाघोली परिसरातील प्रभाग क्रमांक ०३ (अ) मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील निवडणूक रिंगणात आहेत. उच्चशिक्षित डॉक्टर असलेले डॉ. खांदवे-पाटील यांना सामाजिक सेवेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रभागाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांचे आजसासरे स्व. दत्तात्रय (भाऊ) रामभाऊ खांदवे हे स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी जवळपास वीस वर्षे ग्रामपंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्य करत पाणीपुरवठा, वीज, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी उल्लेखनीय काम केले.त्यांचे सासरे स्व. प्रतापराव दत्तात्रय खांदवे-पाटील यांनीही सामाजिक व राजकीय क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्रामस्वच्छता अभियान, शाळांमध्ये संगणक कक्ष उभारणी, पाण्याच्या टाक्या, रस्ते विकास, महिलांसाठी स्वयंरोजगार योजना तसेच युवकांसाठी प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘कृषिभूषण पुरस्कार’ देऊन गौरवले होते.डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील गेल्या अनेक वर्षांपासून लोहगाव, विमाननगर, वाघोली परिसरात आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी आरोग्य शिबिरे, पाणीपुरवठा सुधारणा, स्टॉर्म ड्रेनेजची कामे, महिला बचत गटांना आर्थिक मदत तसेच गरजू नागरिकांसाठी रोजगारनिर्मितीचे उपक्रम राबवले आहेत. जनतेने दाखवलेला विश्वास व दिलेले आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही.
या विश्वासाला मान देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थपणे काम करेन. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ प्रभागामधील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५ जानेवारी रोजी ‘कमळ’ चिन्हावर मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन भाजपचे प्रभाग क्रमांक ०३ चे उमेदवार डॉ. श्रेयस प्रितम खांदवे-पाटील यांनी केले आहे.
Web Summary : Dr. Shreyas Khandve-Patil pledges Lohgaon's development through action, prioritizing roads, water, health, and education. He commits to women's employment, youth skills, a clean environment, and basic amenities for every family, seeking votes for BJP.
Web Summary : डॉ. श्रेयस खांदवे-पाटिल ने लोहगांव के विकास का संकल्प लिया, सड़कें, पानी, स्वास्थ्य और शिक्षा को प्राथमिकता। उन्होंने महिलाओं के रोजगार, युवाओं के कौशल, स्वच्छ वातावरण और हर परिवार तक बुनियादी सुविधाएं पहुंचाने का वादा किया, भाजपा के लिए वोट मांगे।