पुणे : चौरंगी लढतीमध्ये झालेल्या मत विभाजनाचा फायदा घेत भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या घड्याळाची टिक - टिक बंद पाडत गतवेळेपेक्षा जास्त जागा जिंकत महापालिकेचे मैदान मारले आहे. या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सव्वासे जागा जिंकण्याचे भाकीत खरे ठरवत उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्यावर मात केली आहे.
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेल्या पुणे शहरात मागील बारा ते चौदा वर्षांत झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळत आहे. सभागृहाची मुदत संपल्यानंतर मागील पावणे चार वर्षे महापालिकेत प्रशासन राज असून महापालिकेची रखडलेली निवडणूक न्यायालयाच्या निर्णयानुसार जाहीर करण्यात आली. दोन्ही राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धवसेनेसह विविध पक्ष व संघटनांच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि इच्छुकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने महापालिकेच्या विसर्जित सभागृहातील ९९ पैकी ५३ माजी नगरसेवकांचा पत्ता कट करत नवीन चेहऱ्यांना संधी दिली. तसेच ४६ माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले.
मात्र, भाजपने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत उमेदवारी मिळवली. या निवडणुकीत राज्यातील अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करत भाजपसमोर आव्हान उभे केले होते. निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीकेची झोड उठवत मागील सत्ता काळात भाजपने भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. तसेच सत्ता आल्यानंतर पुणेकरांना पीएमपी व मेट्रोचा प्रवास मोफत देण्याचे आश्वासन दिल्याने निवडणुकीत चांगलाच रंग भरला.
तर दुसरीकडे भाजपचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देत शहरातील विविध प्रकल्पांची माहिती देत संपूर्ण प्रचाराची धुरा संभाळली. मोहोळ यांनी सर्वच प्रभागात सभा, रॅल्या घेत संपूर्ण शहर पिंजून काढत १२५ जागा निवडून आणण्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आपला दावा खरा ठरवत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत घड्याळाची टिक - टिक बंद पाडली.
Web Summary : BJP won the PMC election, exceeding expectations by stopping NCP's momentum. Muralidhar Mohol's prediction of securing 125 seats proved accurate, defeating Ajit Pawar despite his promises of free transport. BJP capitalized on vote division, dominating Pune after years of Congress rule.
Web Summary : भाजपा ने पुणे महानगर पालिका चुनाव जीता, राकांपा की गति को रोका। मुरलीधर मोहोल की 125 सीटें हासिल करने की भविष्यवाणी सच हुई, अजित पवार की मुफ्त परिवहन के वादे के बावजूद उन्हें हराया। भाजपा ने वोट विभाजन का फायदा उठाया, कांग्रेस के शासन के बाद पुणे पर दबदबा बनाया।