शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election Results 2026: पुणेकरांनी अजित पवारांचा वादा नाकारला; निवडणुकीतील ५ निर्णायक मुद्दे, भाजपच्या व्हिजनला पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 09:43 IST

PMC Election Results 2026 पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येत आघाडीच्या माध्यमातून लढवली. मात्र, ही आघाडी मतदारांनी नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पुण्याच्या इतिहासातील सर्वांधिक १२० जागा मिळविण्याचा विक्रम भाजपने केला आहे. महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यामध्ये पुणेकरांना मेट्रो आणि पीएमपीचा मोफत प्रवास देण्याचा वादा केला. मात्र, भाजपला घवघवीत यश मिळाल्याने राष्ट्रवादीचा वादा पुणेकरांनी नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

 भाजपच्या व्हिजनला पसंती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी महापालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून शहरात राबवलेल्या प्रकल्पांचा पाढा वाचत पुढील पाच वर्षांत केल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे व्हिजन मांडले. या व्हिजनला पुणेकरांनी पसंती देत महापालिकेच्या पारड्यात शंभरपेक्षा अधिक जागा टाकल्या आहेत.

 दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी नाकारली

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भाजपसोबत घरोबा करून राज्यात सत्तेत वाटा मिळवला. त्यानंतर वारंवार दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढल्याने आंतर वाढले होते. मात्र, राज्यातील नगरपरिषदांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना फटका बसल्यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र येत आघाडीच्या माध्यमातून लढवली. मात्र, दोन पक्षांची ही आघाडी मतदारांनी नाकारल्याचे निकालावरून स्पष्ट होते.

 काँग्रेसची चमकदार कामगिरी

महापालिकेच्या २०१७ सालच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नऊ जागा मिळाल्या होत्या, तर एक काँग्रेस पुरस्कृत उमेदवाराचा विजय झाला होता. महापालिकेची ही निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी(शरद पवार) ने काँग्रेस व उद्धवसेनेपासून फारकत घेत अजित पवार यांच्यासोबत घरोबा केला. यानंतर काँग्रेसने उद्धवसेनेला सोबत घेत निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसने चमकदार कामगिरी करत १५ जागांवर विजय मिळविला.

 दोन्ही शिवसेनासह मनसेवर अविश्वास

महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेने काँग्रेससह मनसेला सोबत घेतले. काही ठिकाणी काँग्रेस, तर काही ठिकाणी मनसेला साथ देत दुहेरी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धवसेनेचा हा प्रयोग मतदारांच्या पचनी पडला नाही. त्यामुळे उद्धवसेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले, तर मनसेचा भोपळाही फुटला नाही. दुसरीकडे शिंदेसेनेने भाजप देत असलेल्या १५ जागा नाकारून स्वबळावर निवडणूक लढवली. मात्र, हा निर्णय त्यांच्या अंगलट आल्याने एकही जागा जिंकता आली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Elects BJP in 2026, Rejects NCP's Free Travel Promise

Web Summary : BJP secured a historic victory in Pune's municipal elections, winning 120 seats. Voters favored BJP's vision, rejecting NCP's free travel promise. Alliances between NCP factions failed, while Congress improved its standing. Shiv Sena and MNS faced setbacks, highlighting a shift in Pune's political landscape.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक निकाल २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस