पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. पुण्याच्या इतिहासातील सर्वांधिक १२० जागा मिळविण्याचा विक्रम भाजपने केला आहे. पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत पुण्याच्या मध्यवर्ती भागातील प्रभाग २४ ची निवडणूक राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी होती. या प्रभागातून कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
''नेकी का काम आंदेकर का नाम”, “बघा बघा मला लोकशाहीत कसं आणलंय”, “आंदेकरांना मत म्हणजे विकासकामाला मत” अशा घोषणा त्याने दिल्या होत्या. तसेच त्याने “मी उमेदवार आहे, दरोडेखोर नाही” अशी भूमिका स्पष्ट केली होती. लोकशाही मार्गानेच जनतेच्या पाठबळावर आपण निवडणूक लढवत असल्याचा दावा त्याने केला होता. इतकेच नाही तर त्याने यावेळी वनराज आंदेकर जिंदाबादच्या घोषणाही दिल्या होत्या. या बंडू आंदेकरला महापालिका निवडणुकीत केवळ १४३ मते मिळाली आहेत. विकासकामाला मत म्हणणाऱ्या बंडू आंदेकरला लोकांची मने जिंकता आली नाहीत. प्रभाग २४ मधून त्यांनी बंडूला स्पष्टपणे नाकारल्याचे दिसून आले. प्रभाग २४ मधून 'ड' गटातून भाजपचे गणेश बिडकर १८, ६४३ मतांनी निवडून आले. तर दुसऱ्या नंबरवर शिवसेनेच्या प्रणव रवींद्र धंगेकरला ९ हजार ३९५ मते मिळाली त्याच गटात बंडू आंदेकरला अत्यंत कमी मते मिळवत १४३ वर समाधान मानावे लागले.
प्रभाग २४ - कसबा गणपती- कमला नेहरू - केईएम रुग्णालय (अंतिम आकडेवारी)
अ) कल्पना बहिरट (भाजप), २०३८२पूनम काळोखे (राष्ट्रवादी), ५०५९वैशाली अफुवाले (शिवसेना), ५१७८रंजना खडके (शिवसेना उबाठा) ३२०५
विजयी - कल्पना बहिरट
ब) उज्ज्वला यादव (भाजप), १७०७१सुजाता शेट्टी (राष्ट्रवादी), ५९५३मेघना तरवडे (शिवसेना),४८९७शिफा शेख (काँग्रेस) ४८८२विजयी: उज्वला यादव
क)देवेंद्र वडके (भाजप), १४६७७जयप्रकाश फुलावरे (राष्ट्रवादी), ३७५८प्रशांत मते (शिवसेना),,४४०८राजेश मोरे (शिवसेना उबाठा), २२०४नितीन परतानी (काँग्रेस), ८६१९
विजयी: वडके
ड) गणेश बिडकर (भाजप), १८६४३गणेश नवथरे (राष्ट्रवादी), २७८०प्रणव धंगेकर (शिवसेना), ९३९५राहुल शर्मा (काँग्रेस), ३०३०किरण कंद्रे (आप) १३७सूर्यकांत आंदेकर १४३
विजयी: गणेश बिडकर
Web Summary : BJP won Pune election. Notorious Andekar, despite slogans, secured only 143 votes. BJP's Ganesh Bidkar won from his ward. BJP dominated.
Web Summary : भाजपा ने पुणे चुनाव जीता। कुख्यात आंदेकर, नारों के बावजूद, केवल 143 वोट हासिल कर पाए। उनके वार्ड से भाजपा के गणेश बिडकर जीते। भाजपा का दबदबा।