पुणे - पुण्यातील हडपसर भागातील श्रीराम चौक काळेपडळ येथे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावर प्रचारादरम्यान काही अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला. यात प्रमोद नाना भानगिरे यांच्या पॅनल मधील महिला उमेदवार सारिका पवार या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अधिकच्या माहितीनुसार, भानगिरे आणि प्रभाग क्रमांक ४१ च्या उमेदवार सारिका पवार या काही कार्यकर्त्यांसह काळेपडळ येथील मयूर जेएमएनएस सोसायटी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक काही अज्ञातांनी त्यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात उमेदवार सारिका पवार जखमी झाल्याची माहिती सामोरे येत आहे. ही घटना ( दि ७ ) आठच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या हल्ल्यात भानगिरे यांच्या कारची काच फुटल्याचे दिसून येत आहे.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/858444570131905/}}}}दरम्यान, काळेपडळ पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांकडून तपास सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहे. या घटनेमुळे परिसरात बंदोबस्त वाढण्यात आला आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे.
Web Summary : Pune Shiv Sena leader's car was attacked with stones in Hadapsar during campaigning. A female candidate was injured. Police are investigating the incident, reviewing CCTV footage. Tension prevails.
Web Summary : पुणे में शिवसेना नेता की कार पर चुनाव प्रचार के दौरान हडपसर में पथराव हुआ। एक महिला उम्मीदवार घायल हो गईं। पुलिस मामले की जांच कर रही है, सीसीटीवी फुटेज खंगाले जा रहे हैं। तनाव व्याप्त है।