पुणे : पुण्यात भाजप आणि शिंदेसेना स्वबळावर लढत आहे. भाजपकडून सन्मानजनक जागा ना मिळाल्याने शिंदेसेनेने अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेसेना पुण्यात १६५ पैकी १२० जागांवर आपले उमेदवार लढवत आहे. काल उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी शिंदेसेनेच्या कुणीही माघार घेतली नाही. अखेर आजपासून पुण्यात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आहे. शिंदेसेनेकडून मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी पुण्यात आले आहेत. यावेळी त्यांनी महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी कसा विकास होतो ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील असे आवाहन पुणेकरांना केले आहे.
सामंत म्हणाले, भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिक युती टिकली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. काही लोकांचा गैरसमज होता की, आम्ही 40 देखील उमेदवार उभे करू शकत नाही. आम्हाला वेळ कमी पडला नाही तर आपण 165 उमेदवार थांबवले असते. समोरच्या लोकांनी टीका केली तर त्याला विकासातून उत्तर द्या. ही लढाई विकासाची आणि विश्वासाची आहे. पुण्यात शिवसेनेची खरी ताकद काय आहे हे दाखवून द्या. पुढचे १४ दिवस २४ तास काम करा. यावर्षीची महानगरपालिका पुणेकरांनी आमच्या ताब्यात द्यावी कसा विकास होतो ते एकनाथ शिंदे साहेब दाखवून देतील.
मिठाचा खडा पडेल असं काम कोणाकडूनही होऊ नये
एखाद्या पक्षाची मक्तेदारी म्हणजे हे शहर असं पुणेकर समजत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी आज गेलो तिथे लोकांनी सांगितलं की, आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. आज अशी निवडणूक लढू की, पाच वर्षात 165 पैकी 120 जागा आपण जिंकल्या पाहिजे. १ तासात आपण निर्णय घेतले आहेत. पुण्यात जर आपण ताकद लावली तर एक नंबरचा पक्ष शिवसेना आहे. पण काही लोक कमी लेखत आहेत. त्यांच्यावरती बोलायला नको. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो. लोक आम्हाला सांगत होते की तुमच्याकडे एकच जागा आहे. तुम्हाला पंधरा कसा देणार. मित्र पक्षांनी समजून घ्यायला हवं होतं. महायुती मध्ये मिठाचा खडा पडेल असं काम कोणाकडूनही होऊ नये. एकनाथ शिंदे साहेब नरेंद्र मोदी आणि अमित शहांच नेतृत्व मानतात. आपण महायुती म्हणून सत्तेत आहोत असेही सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.
Web Summary : Uday Samant initiated Shiv Sena's Pune election campaign, emphasizing development and trust. He urged workers to demonstrate Shiv Sena's strength, aiming to win 120 seats and vowing continued support for public schemes. He stressed maintaining unity within the ruling coalition.
Web Summary : उदय सामंत ने शिव सेना के पुणे चुनाव अभियान की शुरुआत की, विकास और विश्वास पर जोर दिया। उन्होंने कार्यकर्ताओं से शिव सेना की ताकत दिखाने का आग्रह किया, जिसका लक्ष्य 120 सीटें जीतना और सार्वजनिक योजनाओं के लिए निरंतर समर्थन का वादा करना है। उन्होंने सत्तारूढ़ गठबंधन के भीतर एकता बनाए रखने पर जोर दिया।