शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: मी कोथरूड मध्ये राहतो तिथे आम्हाला कोण पैसे देणार? आम्हाला पैसे द्यायला लावतील - प्रवीण तरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:35 IST

PMC Election 2026 काही भागात पैसे वाटल्याचे कानावर येतंय, ती खूप खेदाची गोष्ट असल्याचे अभिनेते प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे

पुणे: पुण्यात कालपासून पैसे वाटपाच्या घटना समोर आल्या आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या घटना उघडकीस आणल्या आहेत. परंतु काही ठोस पुरावे नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्याबाबत अभिनेते प्रवीण तरडे यांनी मिश्किल टिपण्णी केली असून ही खेदाची गोष्ट असल्याचे सांगितले आहे. पुण्यात त्यांनी सहपत्नी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. मी कोथरूड मध्ये राहतो तिथे आम्हाला कोण पैसे देणार? आम्हाला पैसे द्यायला लावतील. काही भागात पैसे वाटल्याचे कानावर येतंय, ती खूप खेदाची गोष्ट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

तरडे म्हणाले, पुण्यात मतदानाची टक्केवारी चांगली राहील. मनातला महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणण्यासाठी लोक बाहेर पडले आहेत. ही गल्ली बोलतील कामांची निवडणूक आहे. लोकसभा आणि विधानसभा झाली. दररोजच्या सोशल मीडियावरील गप्पाटप्पा भांडण यामुळे लोक अस्वस्थ होतात. अस्वस्थ असले तरी मतदान करावे लागेल. मतदान केलं नाही तर तुम्हाला पुन्हा बोलण्याचा अधिकार राहत नाही.  

सामंजस्याने लढाई झाल्या

पुण्यात ज्यांचं गेल्यावेळी सरकार होतं त्यांचं पुन्हा येणार आहे. पुण्यात दादागिरी की अण्णागिरी असं वातावरण होतं. त्यामुळे पुण्याच्या प्रचारात रंगत आली. पुण्याचा विकास सुरेश कलमाडी यांच्या काळात झाला. पुणे मॅरेथॉन, पुणे फेस्टिवल, गणेश कला, बालेवाडी स्टेडियम हे सुरेश कलमाडी यांच्या काळात झाली. आता मुरलीधर मोहोळ जोरात फाईट देत आहे. शेवटी ते पैलवान आहे. अजितदादा सुद्धा जोरात आहेत. कुणीही कमरेखाली टीका केली नाही. यंदाच्या निवडणुकीत तुंबळ महायुद्ध झाले पण रक्तपात झाला नाही. सामंजस्याने लढाई झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

16 तारखेपर्यंत एकमेकांवर टीका चालते

पुढील काळात पुण्यात फक्त मुरलीधर मोहोळ जोरात राहतील. माझा मित्र आहे म्हणून मी सांगत नाही. एकंदर राजकारणातील प्रगल्भता मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आली आहे. मुरलीधर मोहोळ मोठमोठ्या योद्धांना अंगावर घेतो. पण 16 तारखेपर्यंत एकमेकांवर टीका चालते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकत्रच लढणार असल्याचे तरडे म्हणाले आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Praveen Tarde on PMC Election: Who will give us money?

Web Summary : Actor Praveen Tarde humorously commented on alleged money distribution in Pune's PMC election. He emphasized voting's importance and praised past development under Suresh Kalmadi, while highlighting Murliधर Mohol's political maturity and strong fight in the election.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Pravin Tardeप्रवीण तरडेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६murlidhar moholमुरलीधर मोहोळPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र