शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
2
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
3
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
4
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
5
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
6
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
7
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
8
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
10
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
11
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
13
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
14
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
15
अमेरिकेने हाय टॅरिफ लादला; भारताने 'या' देशांकडे वळवला मोर्चा, निर्यातीत मोठी वाढ, पाहा आकडेवारी
16
भारत-बांगलादेश वादात पाकिस्तानची 'लुडबुड'; स्वतःच्या देशात सुरक्षेचा पत्ता नाही आणि म्हणतंय...
17
भारतावर विश्वास ठेवा, इतरांच्या दाव्यांकडे दुर्लक्ष करा; भारत-अमेरिका करारावर गोयल यांची स्पष्टोक्ती
18
"मी यांना चॅलेंज देतो की, या ठाकरे बंधूंनी..."; भाजपच्या गिरीश महाजन यांचा आक्रमक पवित्रा
19
IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंडकडून सलामी जोडीनंतर डॅरिल मिचेलची बॅट तळपली! टीम इंडियासमोर ३०१ धावांचं आव्हान
20
₹३६३४१२००००००० स्वाहा...! देशातील 7 कंपन्यांना मोठा फटका, रिलायन्सचं सर्वाधिक नुकसान 
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: 'पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा', पुण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संयुक्त जाहीरनाम्याचे प्रकाशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 19:37 IST

PMC Election 2026 'पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास ३ वर्षातच दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करू', असा शब्द अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी दिला आहे.

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) या दोन पक्षांचा आठ कामांची हमी देणारा आणि “पाच कामं पक्का वादा, तीन कामं करू जादा” अशी टॅगलाईन असलेला संयुक्त जाहीरनामा उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते शनिवारी प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्यात ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्तीसह मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, दोन्ही पक्षांचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील, सुनिल टिंगरे, सुभाष जगताप, विशाल तांबे, दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पाश्चात्त्य देशांमधील शहरांच्या धर्तीवर पुण्यातही मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास आणि ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्त या महत्वपूर्ण योजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी मोफत टॅब, शहर वाहतूक कोंडी मुक्त, खड्डे व प्रदूषण मुक्त, आदर्श शाळा, टॅंकर माफीयांचे उच्चाटन व नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा, चांगल्या आरोग्य योजना, झोपडपट्टी पुनर्वसन व जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचे आश्वासन दिले आहे.

'गुंठेवारीची घरे सन्मानाने नियमित करण्यास प्राधान्य दिले जाईल. शहरात निर्माण होणाऱ्या ९०० एमएलडी पैकी ५०६ एमएलडी मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित पाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने नदीच्या प्रदूषणात भर पडते. त्यामध्ये सुधारणा केली जाईल. नव्या गावांसह वडगाव शेरी, वाघोलीमधील टॅंकर माफियाला आळा घालून पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था निर्माण केली जाईल, मुळशी धरणातून पुण्याला अतिरिक्त पाणी आणणार आहे.'पुणेकरांनी आमच्यावर विश्वास दाखविल्यास तीन वर्षातच दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करू', असा शब्द अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी पुणेकरांना दिला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हमीपत्रातील आश्वासने

- मेट्रो आणि पीएमपीएल बसचा मोफत प्रवास- ५०० चौरस क्वेअर फूटापर्यंतच्या मिळकती करमुक्त- पाणी पुरवठ्याच्या निश्चित वेळा- टॅंकरमाफीयांचे १०० टक्के उच्चाटन- ३३ मिसींग लिंक आणि १५ मुख्य रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करणार- रस्त्यावरील खड्डे ७२ तासात बुजविणार- स्वच्छतेला प्राधान्य, कचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करणार- हायटेक आरोग्य सुविधा, एमआरआय, सीटी स्कॅन अल्प दरात देणार- रुग्णालयांमध्ये २८०० खाटा व अत्याधुनिक बर्न वॉर्डची रचना- ट्रॅफिक, खड्डे व प्रदूषणमुक्त पुणे शहर करण्यावर भर- झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन व जुन्या घरांचा विकास- शहरात १५० आदर्श शाळा करणार

English
हिंदी सारांश
Web Title : Pune NCP promises free travel, tax relief in manifesto.

Web Summary : NCP's Pune election manifesto promises free metro and bus travel, property tax exemption up to 500 sq ft, and improved infrastructure. Ajit Pawar and Supriya Sule pledged to fulfill these promises within three years, focusing on water supply and slum rehabilitation.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवार