शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: वाहतूक कोंडी फोडण्याचा भाजपचा 'मास्टरप्लान' तयार; प्रभाग क्र ९ मधील लहू बालवडकरांचा वचननामा जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:08 IST

PMC Election 2026 लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

पुणे: पुणे महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आता प्रचार शिगेला पोहोचलाय, सर्वच पक्षांनी उमेदवारांनी आपला वचननामा जाहीर केलाय,  बाणेर, बालेवाडी, पाषाण,सुस–महाळुंगे परिसरातील सर्वात ज्वलंत प्रश्न असलेल्या वाहतूक कोंडीवर भाजपने थेट लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील भाजपचे उमेदवार लहू बालवडकर यांनी “विकास कागदावर नव्हे, तर रस्त्यावर दिसला पाहिजे” या भूमिकेतून प्रभागातील वाहतूक आणि रस्ते व्यवस्थेसाठी सविस्तर आराखडा जाहीर केला आहे.

बालवडकर यांच्या मते, प्रभागातील वाढती लोकसंख्या, झपाट्याने वाढणारे वाहनांचे प्रमाण आणि अपूर्ण रस्ते यामुळे वाहतूक कोंडी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकणे नव्हे, तर ही कोंडी प्रत्यक्षात सोडवणे हेच खरे आव्हान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.दस मे बस’ने सार्वजनिक वाहतुकीला चालना प्रभागात सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी ‘दस मे बस’ योजना राबवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या योजनेत १० किलोमीटरपर्यंत फक्त १० रुपयांत प्रवास करता येणार असल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होईल, प्रदूषण घटेल आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा करण्यात आला आहे.

बाणेर–बालेवाडीकरांसाठी भुयारी मार्ग आणि ३० मीटर रस्ता वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाणेर–बालेवाडी भागात बीट वाईज चौक, मर्सिडीज चौक आणि मिटकॉन परिसरात प्री-कास्ट तंत्रज्ञानावर आधारित तीन नवीन भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ज्युपिटर रुग्णालय ते लक्ष्मी माता मंदिर दरम्यान ३० मीटर रुंदीचा रस्ता, दसरा चौक ते सदानंद रेसिडेन्सी रोडचे अपूर्ण काम पूर्ण करणे, बालेवाडी ते कस्पटे वस्ती ‘मिसिंग लिंक’ वेगाने पूर्ण करणे आणि पुनावळे ते चांदणी चौक सेवा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा समावेश आराखड्यात आहे.

पार्किंगसाठी नियोजित P1–P2 झोन

रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी प्रभागात नियोजित P1 आणि P2 पार्किंग व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्यालगत असलेल्या अॅमेनिटी स्पेसेसमध्ये पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याने अनधिकृत पार्किंगला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सुस- पाषाण पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक आराखडा

सुस खिंडीतील सेवा रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करून एकेरी वाहतूक व्यवस्था, मुख्य रस्ता व सेवा रस्त्यावरील पदपथांचे रुंदीकरण, सुस पुल ते रवीनगरदरम्यान स्मार्ट सिग्नल, सुस रोडवरील अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणि P1–P2 पार्किंग झोन निश्चित करणे, तसेच पाषाण,सुतारवाडी,सोमेश्वरवाडी परिसरात पक्क्या व टिकाऊ रस्त्यांचे जाळे उभारणे हा या विशेष आराखड्याचा भाग आहे.

लहू बालवडकर यांनी मांडलेला हा वाहतूक आणि रस्तेविकासाचा सविस्तर रोडमॅप केवळ घोषणापुरता न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीवर आधारित असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांच्या उमेदवारीभोवती विकासाच्या अपेक्षांचे वातावरण तयार झाले असून, निवडणूक ही केवळ राजकीय नव्हे तर नागरी जीवनाच्या दृष्टीनेही निर्णायक ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP's Masterplan to Solve Traffic Congestion in PMC Election 2026

Web Summary : BJP candidate Lahu Balwadkar unveils a plan to tackle traffic woes in Pune's Ward 9. Proposals include underground routes, road expansions, 'Dus Me Bus' public transport, parking zones, and a dedicated plan for Sus-Pashan, aiming for practical solutions, not just promises.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBanerबाणेरBalewadiबालेवाडीTrafficवाहतूक कोंडीMahayutiमहायुतीPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६