शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
2
"पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना वेळीच फोन केला असता तर...!"; अमेरिकन वाणिज्यमंत्र्याचा मोठा खुलासा
3
'स्टॉपेज रेशो'ने वाढवली धाकधूक! गुंतवणूकदार म्यॅुच्युअल फंडातून का पडतायत बाहेर?
4
सबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणी मुख्य पुजारी ताब्यात, एसआयटीची कारवाई   
5
एस जयशंकर यांना अमेरिकेत करावा लागला रस्त्याने ६७० किमी प्रवास; बलाढ्य अमेरिकेवर ट्रम्प यांनी ही काय वेळ आणली...
6
‘महायुती सत्तेवर आली तरी मुंबईचं बॉम्बे होणार नाही, पण उद्धव ठाकरे सत्तेवर आले तर...’, नितेश राणेंचा दावा 
7
कर्जबाजारी पाकिस्तानचा ओव्हर कॉन्फिडन्स; फायटर जेट विकून IMF चे कर्ज फेडण्याचा दावा
8
केवळ एकच व्हिडीओ, अन् यूट्युबवर लावली ‘आग’, केली ९ कोटींची कमाई, नेमकं काय आहे त्यात? 
9
PMC Election 2026: शिवसेना स्वबळावर लढत आहे, म्हणून कुणीही हलक्यात घेऊ नका; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
"इम्तियाज जलील हा भाजपाचा हस्तक, त्याने शहराला..."; ठाकरेंच्या नेत्याचा घणाघात, फडणवीसांवरही 'बाण'
11
डोनाल्ड ट्रम्प यांची आर्थिक 'दादागिरी'? उदय कोटक यांनी २०२४ मध्येच केली होती भविष्यवाणी
12
स्टार क्रिकेटर Jasprit Bumrah चा 'रशियन सुंदरी' सोबतचा फोटो व्हायरल; कोण आहे 'ही' तरुणी?
13
Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 
14
मोठा निष्काळजीपणा! नर्सने कापला दीड महिन्याच्या बाळाचा अंगठा, नेमकं काय घडलं?
15
० ० ० ० ० ० ... ६ चेंडूत हव्या होत्या ६ धावा... महाराष्ट्राचा 'जादूगार' रामकृष्णने जिंकवली मॅच
16
तुमचा iPhone हॅक तर झाला नाही ना? 'या' ४ गोष्टी दिसताच समजा कुणीतरी करतंय तुमची हेरगिरी
17
इराणच्या 'या' निर्णयाचा भारताला मोठा फटका, 2000 कोटी रुपयांवर आडलं घोडं...! काय आहे संपूर्ण प्रकरण?
18
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा; मैदानावरच फलंदाजाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
19
Malegaon Municipal Election 2026 : भाजपच्या दोन बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी, वरिष्ठांच्या आदेशान्वये कारवाई
20
अपघातग्रस्तावर मोफत उपचार! मदत करणाऱ्याला ₹25 हजारांचे बक्षीस; मोदी सरकार आणतेय नवीन योजना
Daily Top 2Weekly Top 5

PMC Election 2026: पुण्यात पैसे वाटप करताना राष्ट्रवादी उमेदवार पुत्रासह १५ जण अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 15:48 IST

- या प्रकरणातील नीलेश साहेबराव मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस

बाणेर :पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेर-पाषाण परिसरात मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात माजी नगरसेवकाच्या पुत्रासह एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाणेर पोलिस ठाण्यात गुर.नं. ०२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १७१, १७४ व २२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी नीलेश साहेबराव मतदानासाठी नागरिकांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस बेलदार (वय ४५), पोलिस शिपाई, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा पुणे शहर आहेत. पाषाण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जानेवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास रानमळा हॉटेलच्या मागे, साईनगर, सोमेश्वरवाडी, परिसरात हा प्रकार घडला.आरोपी किरण बाबूराव चांदेरे (रा. वीरभद्र नगर, बाणेर) व इतर १४ जणांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना मतदान करण्यासाठी नागरिकांना प्रलोभन दाखविले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश रायकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अलका सरग करत आहेत. निवडणूक काळात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांची कडक नजर असल्याचा असल्याचे सांगितले. निवडणूकीत उमेदवारांकडून किंवा त्यांच्या समर्थकांकडून पैसे वाटणे, प्रलोभन देण्याचे प्रकार दिसल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : PMC Election: NCP Candidate's Son, 15 Arrested for Distributing Money

Web Summary : Ahead of PMC elections, 15 individuals, including an NCP candidate's son, were arrested in Baner-Pashan for allegedly bribing voters. Police filed a case and are investigating the matter, urging citizens to report such incidents.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PuneपुणेPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026NCPराष्ट्रवादी काँग्रेसArrestअटकAjit Pawarअजित पवार