Pune: अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे साऊंड बॉक्स गेले चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 15:39 IST2021-11-22T15:38:04+5:302021-11-22T15:39:49+5:30
महापालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाट्यगृह उभारताना दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती....

Pune: अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे साऊंड बॉक्स गेले चोरीला
पुणे: बिबवेवाडीमधील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील जवळपास दोन कोटी रुपये किंमतीचे साउंड बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली आहे. चोरून नेलेल्या साउंड बॉक्सच्या ठिकाणी डुप्लिकेट साउंड बसवलेले आहेत. हा प्रकार लॉकडाउनमध्ये घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नाट्गृहाला सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही असतानाही हा प्रकार घडला आहे. त्यामुळे मख्यसभेत यामध्ये महापालिकेतील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
महापालिकेचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे नाट्यगृह उभारताना दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम बसवण्यात आली होती. कोरोनाच्या काळात जवळपास दीड वर्षांपासून नाट्यगृह बंद होती. याकाळात साठे नाट्यगृहातील बॉश कंपनीचे सुमारे १२ साऊंड चोरीला गेले आहेत. हा प्रकार लक्षात येऊ नये म्हणून याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आल्याची घटना घडली आहे. महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवक सुभाष जगताप यांनी हा विषय मांडताच खळबळ उडाली आहे. यामध्ये महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग असल्याशिवाय हा प्रकार होऊ शकत नाही त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जगताप यांनी केली.