शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या प्रश्नावर सर्वतोपरी साह्य करणार

By admin | Updated: January 28, 2015 02:37 IST

‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचा (पीएमपी) कार्यभार हाती घेतल्यापासून श्रीकर परदेशी चांगले काम करीत आहेत

पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचा (पीएमपी) कार्यभार हाती घेतल्यापासून श्रीकर परदेशी चांगले काम करीत आहेत. पीएमपीच्या सुधारणेसाठी परदेशींना काहीही मदत हवी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी बोलावे; त्यांना सर्वोतोपरी मदत केली जाईल,’ अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच पीएमपीच्या प्रश्नात लक्ष घालून त्याला पाठबळ दिल्याने पीएमपीची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. चाकण येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वाहतूककोंडी व पीएमपीच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी श्रीकर परदेशी करीत असलेल्या प्रयत्नांचे तोंडभरून कौतुक केले. परदेशी यांना त्यासाठी काहीही मदत हवी असल्यास त्यांनी थेट माझ्याशी बोलावे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.पीएमपीच्या ६०० बस बंद पडल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडालेला होता. यातून मार्ग काढण्यासाठी पीएमपीला तातडीने आयएएस दर्जाचा अधिकारी देण्यात येईल, असे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. गेल्या ३ महिन्यांमध्ये परदेशी यांनी पीएमपीला रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही महापालिकांच्या मुख्य सभेपुढे पीएमपीच्या सुधारणेचा दीर्घकालीन आराखडा सादर करून नेमके काय करावे लागणार आहे, याची माहिती परदेशी यांनी दिली आहे. पीएमपीच्या ताफ्यातील वाढत्या बसची संख्या पाहता, येत्या काही वर्षात १४३ एकर जागेची आवश्यकता भासेल, असे त्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)