शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा; शहरात वाहतुकीत बदल, एस.पी. कॉलेज परिसरात रस्ते बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 12:59 IST

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर ते मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात येण्यास मनाई

पुणे : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी (दि. १२) शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात येणार आहेत. टिळक रस्त्यावरील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर ही सभा होणार असल्याने या भागातील रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे.

रस्ता बंद

- सदाशिव पेठेतील विजयानगर काॅलनी परिसरातील ना. सी. फडके चौक ते नाथ पै चौक दरम्यानचा रस्ता वाहतुकीस बंद असेल.पर्यायी मार्ग- वाहनचालकांनी ना. सी. फडके चौकातून डावीकडे वळून निलायम चित्रपटगृह मार्गे पर्वती उड्डाणपुलाखालील रस्त्याने सिंहगड रस्त्याकडे जावे. नाथ पै चौकातून वाहनचालकांनी सरळ सिंहगड रस्त्याकडे जावे.रस्ता बंद- बाबुराव घुले पथ, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, आंबील ओढा परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत.पर्यायी मार्ग- वाहनचालकांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालय चौकातून डावीकडे वळून जाॅगर्स पार्कमार्गे शास्त्री रस्त्याकडे जावे. तेथून इच्छितस्थळी जावे.

नाे पार्किंग

साने गुरुजी पथ परिसरात (टिळक रस्ता चौक ते निलायम चित्रपटगृह) सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

जड वाहनांना बंदी...

पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त सोमवारी मध्यरात्री बारानंतर ते मंगळवारी मध्यरात्री बारापर्यंत जड वाहनांना शहरात येण्यास मनाई केली आहे. सोलापूर रस्ता (भैरोबा नाला चौकाच्या पुढे), नगर रस्ता (खराडी बाह्यवळण चौकाच्या पुढे), आळंदी रस्ता (बोपखेल फाटा चौकाच्या पुढे), जुना मुंबई-पुणे रस्ता (हॅरीस पुलाच्या पुढे), ओैंध रस्ता (राजीव गांधी पुलाच्या पुढे), बाणेर रस्ता (राधा हाॅटेल चौकच्या पुढे), पाषाण रस्ता (छत्रपती शिवाजी चौकाच्या पुढे), पौड रस्ता (पौडा फाटा चौकाच्या पुढे), कर्वे रस्ता (वारजे उड्डाणपूल चौकाच्या पुढे), सिंहगड रस्ता (वडगाव उड्डाणपुलाच्या पुढे), सातारा रस्ता (मार्केट यार्ड चौकाच्या पुढे), सासवड रस्ता (बोपदेव घाटमार्गे) कोंढव्यातील खडी मशीन चौकाच्या पुढे, हडपसर ते सासवड रस्ता (मंतरवाडी फाटा ते हडपसरकडे), लोहगाव रस्ता (पेट्रोल साठा चौकाच्या पुढे) या मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Trafficवाहतूक कोंडीcarकारbikeबाईक