शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

आयडियाची कल्पना! कंपनीच्या मोकळ्या आवारात वनौषधींची लागवड; उत्पन्नही झाले सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 15:04 IST

पैसे महत्वाचे नाही तर थोडा विचार केला, कष्ट केले तर निसर्ग कधीही आपले हात रिकामे राहू देत नाही....

पुणे : एखाद्या कंपनीचे मोकळे आवार म्हणजे एरवी नको असलेले साहित्य टाकण्याची जागा किंवा फार झाले तर वाहनतळ वगैरे. एका कंपनीच्या चालकाने मात्र या मोकळ्या आवाराचा हौसेला कल्पकतेची जोड देत वनौषधी लागवडीसाठी उपयोग केला व आता त्यापासून उत्पन्नही मिळू लागले आहे.

मुळशी तालुक्यातील भरे गावात ही कंपनी आहे. श्रीकांत व शुभांगी आचार्य ही कंपनी चालवतात. त्यांच्या कंपनीच्या आवारात मोकळी जागा होती. त्याचा काहीच वापर होत नव्हता. दोघांनीही काही वर्षांपुर्वी त्या जागेवर झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला. झाडेच लावायची तर मग ती उपयोगी असलेली का नको याविचाराने त्यांनी काही तज्ज्ञ व्यक्तींबरोबर चर्चा करून वनौषधींची लागवड करण्याचे ठरवले.

बेहडा, हिरडा, अश्वगंधा, अडूळसा, बिब्बा, शतावरी, अशोक अशी प्रत्येकी २, ३ झाडांची लागवड त्यांनी केली. आता ही झाडे चांगली वाढली आहेत. यावर्षी त्यांनी एका झाडाचा बेहडा काढला. तो निघाला २५ किलो. हा औषधी आहे. वैद्यांकडे तो ६०० रूपये किलोने विक्री करतात.  त्याचा घाऊक दर ३०० रूपये किलोपेक्षा जास्त आहे. त्यापेक्षा कमी दराने विक्री केली तरीही ६ हजार रुपये मिळतीलच असा आचार्य यांना विश्वास आहे. हे एका झाडाचे. दोन झाडांचे वर्षाला १२ हजार रूपये. याचप्रमाणे अन्य औषधी झाडांपासूनही नक्की उत्पन्न मिळणार याची त्यांनी खात्री आहे.

पैसे महत्वाचे नाही तर थोडा विचार केला, कष्ट केले तर निसर्ग कधीही आपले हात रिकामे राहू देत नाही असे आचार्य यांचे म्हणणे आहे. परदेशी वृक्ष लावण्याचे बंद होऊन रिकामी जागा असलेल्यांनी अशा वृक्षांची लागवड करावी असे ते म्हणाले.  ३६५ दिवस सूर्यप्रकाश, तीन प्रकारचे हवामान, पाण्याची भरपूर उपलब्धता हे भारतीय निसर्गाचे जगात कुठेही नसलेली वैशिष्ट्य आहे व आपण त्याचा भरपूर  वापर करायला हवा. एकदा झाड लावले की ते तग धरेपर्यंत त्याकडे लक्ष द्यावे लागते, नंतर त्याचे ते आपोआप वाढते व थंड सावलीसह अनेक गोष्टी देते असा अनुभवही त्यांनी सांगितला. कंपनीतील ही मोकळी, ओसाड असलेली जागा आता हिरवीगार झाली आहे. आणखी काही जागा होती तिथेही त्यांनी आता चिकू, पेरू, पपई, याबरोबरच आंबा, जांभूळ असे मोठे वृक्षही लावले आहेत.  मोकळी जागा असलेल्या प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यावी अशी त्यांची इच्छा आहे 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealthआरोग्य