शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पूर्तता होण्यापूर्वीच प्लँट सुरू; महापालिकेचा कारवाईचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 14:29 IST

महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या

- हिरा सरवदेपुणे : गुईलिन बेरी सिंड्रोमचा (जीबीएस) सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या धायरी, किरकटवाडी, सणसवाडी, नांदेड गावांतील महापालिकेने बंदी घातलेले खासगी आरओ प्रकल्प नियमावलीच्या अधिन राहून ते पुन्हा सुरू करण्यास महापालिकेने परवानगी दिली. मात्र, नियमावलींची पूर्तता करण्यापूर्वीच अनेकांना तातडीने प्रकल्प सुरू केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महापालिकेकडून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. यासंबंधी प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिल्या आहेत.

गेल्या महिन्यात शहरात विशेषतः सिंहगड रस्ता भागातील धायरी, किरकटवाडी, सणसवाडी, नांदेड आदी गावांमध्ये माेठ्या प्रमाणावर जीबीएस या आजाराचे रुग्ण आढळून आले हाेते. हा आजार दूषित पाण्यामुळे हाेत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी व्यक्त केल्यानंतर महापालिकेने या परिसरातील विविध ठिकाणच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. यामध्ये पाण्यात दोष आढळलेल्या खासगी आरओ प्रकल्प सील केले होते.

त्यानंतर आरओ प्रकल्पाची महापालिकेकडे नोंदणी करावी, नियमित देखभाल दुरुस्ती करून घ्यावी, राज्य सार्वजनिक आरोग्य शाळेकडून पाण्याची तपासणी करून घ्यावी, असे नियम लागू करून बंद आर.ओ. प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास दोन दिवसापूर्वी परवानगी दिली आहे. तसेच आरओ प्रकल्प असलेल्या हद्दीतील क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य निरीक्षकांनी वेळोवेळी पाण्याचे नमुने घेऊन तपासणी करावी, पाणी दूषित असल्यास संबंधित प्रकल्प बंद करावा, असेही आदेश दिले आहेत.

दरम्यान, महापालिकेने परवानगी देत असल्याचे जाहीर केल्याबरोबर प्रकल्प चालकांनी कसलीही तपासणी न करता थेट सील केलेले प्रकल्प सुरू केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमांची पूर्तता न करता सुरू केलेल्या आरओ प्रकल्पांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणी