शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 21:22 IST

मुंबईत ६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे

ठळक मुद्देभाजपाचा वर्धापनदिन: पालकमंत्री गिरीश बापट यांचा पुढाकार

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या मुंबईत होणाºया वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातून कार्यकर्ते नेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन पुण्यात शनिवारी करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत मराठा क्रांती मोर्चासह अनेक भव्य मोर्चे निघाले. नुकताच शेतकऱ्यांचाही मोर्चा निघाला. त्या पार्श्वभूमीवर भाजपानेही या वर्धापनदिनाला मोठी गर्दी जमवण्याचे ठरवले आहे.पक्षनेतृत्त्वानेच तसे स्पष्ट आदेश राज्यातील सर्व जिल्हा तसेच शहर भाजप शाखांना दिले आहे. तसेच खासदार,आमदारांसह सत्तेत असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची व्यवस्था करावी ;असेही सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे बापट यांनी शनिवारी सकाळी डीपी रस्त्यावरील एका मोठ्या कार्यालयात नियोजनाची बैठक घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे आमदार, खासदार यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. ७०० पेक्षा जास्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मुंबईत ६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम होणार आहे.अध्यक्षांकडून थेट गर्दी जमविण्याचे आदेश मिळाल्याची माहिती आहे.देशातील बहुसंख्य राज्यात आता भाजपाची सत्ता आहे. तरीही संघटनेच्या स्तरावर पक्षाचे अस्तित्व बळकट असल्याचे जनतेला पटवून देणे आवश्यक आहे व त्यासाठी वर्धापनदिन ही संधी असल्याचे पदाधिकाºयांना कळविण्यात आले आहे.पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व भागातून किमान ५ लाख कार्यकर्ते  या कार्यक्रमाला उपस्थित असावेत असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळेच बापट यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.यासाठी आपापल्या परिसर स्तरावर योग्य ते नियोजन करावे, असे बापट यांनी सर्वांना सांगितले. 

 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाAmit Shahअमित शाहgirish bapatगिरीष बापट