‘पिक्सल्स'ने पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला होणार सुरुवात, १९ संघांचे होणार सादरीकरण

By श्रीकिशन काळे | Updated: December 26, 2023 20:44 IST2023-12-26T20:42:55+5:302023-12-26T20:44:09+5:30

स्पर्धेसाठी आज (दि. २६) सायंकाळी लॉटस् काढण्यात आले....

'Pixels' will start the Purushottam Karandak grand finale, a total of 19 teams will perform | ‘पिक्सल्स'ने पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला होणार सुरुवात, १९ संघांचे होणार सादरीकरण

‘पिक्सल्स'ने पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला होणार सुरुवात, १९ संघांचे होणार सादरीकरण

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी बुधवारपासून (दि. २७) सुरू होत आहे. महाअंतिम फेरीत राज्यातील १९ संघांचा सहभाग असून, पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ‘पिक्सल्स' एकांकिकेने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी आज (दि. २६) सायंकाळी लॉटस् काढण्यात आले.

दि. २७ आणि दि. २८ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ आणि सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत, तर दि. २९ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ अशा पाच सत्रांत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २९ रोजी सायंकाळी ५ वाजता सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.

दि. २७ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका : वेळ : सकाळी ९ : टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (पिक्सल्स), देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, संभाजीनगर (खळगं खळगं), डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर (न्यायालयात जाणारा प्राणी), प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (साकव).

सायंकाळी ५ : मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे (फेलसेफ), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (रात्र अंधार), शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (जंगल जंगल बटा चला है), सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे (कृष्ण पक्ष).

दि. २८ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका : वेळ सकाळी ९ : फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी (बोबड्या), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तो पाऊस आणि टाफेटा), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर (समांतर), डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण (हॅपी फादर्स डे),

सायंकाळी ५ : मराठवाडा विधि महाविद्यालय, पुणे (रवायत ए विरासत), देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर (असणं नसणं), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संभाजीनगर (चुकलं तर माफ करा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग, संभाजीनगर (अल्प भूधारक).

दि. २९ रोजी सादर होणाऱ्या एकांकिका : वेळ : सकाळी ९ : प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, सातारा (पाहिजे म्हणजे पाहिजे), महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (निर्झर), स. ह. केळकर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, देवगड (वन पीस).

Web Title: 'Pixels' will start the Purushottam Karandak grand finale, a total of 19 teams will perform