शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची ४४३ कोटींची निविदा प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:37 IST

- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून योजनेस गती : प्रदूषण आणि पूर नियंत्रण, मैलाशुद्धीकरण केंद्रासह नदीकाठ सुशोभीकरण होणार

पिंपरी : लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून गती मिळाली आहे. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर इंद्रायणी नदी सुधारअंतर्गत विविध कामांसाठी महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ४४३ कोटी ५१ लाख १० हजार १५२ रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण, मैलाशुद्धीकरण केंद्रासह इंद्रायणी नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्षेत्रात तळवडेपासून चऱ्होलीपर्यंत सुमारे २०.६ किलोमीटर इंद्रायणी नदीची लांबी आहे. नदीच्या उत्तरेस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) हद्द आहे. यामध्ये येलवाडी, म्हाळुंगे, निघोजे, मोई, कुरुळी, चिंबळी, केळगाव, आळंदी, चऱ्होली खुर्द, धोनोरे आदी गावांचा समावेश आहे.

नदीकाठी देहू आणि आळंदी ही तीर्थक्षेत्रे आहेत. आषाढी, कार्तिकी एकादशी, संत तुकाराम महाराज बीज या सोहळ्यांसह वर्षभर वारकरी या दोन्ही तीर्थक्षेत्रांवर येतात. इंद्रायणी नदीमध्ये स्नान करतात. मात्र, नदी प्रदूषित झाल्याने स्थान करण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक शहरे, गावे आणि औद्योगिक परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडल्याने नदी प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे प्रदूषण आणि पूर नियंत्रण करण्याचा निर्णय झाला आहे.

येत्या १८ डिसेंबरपर्यंत निविदा भरता येणार

वारकरी सांप्रदायामध्ये श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीसाठी नदी सुधार प्रकल्पाची घोषणा झाली. अनेक वर्षांपासून त्याची चर्चा सुरू आहे. महापालिकेने इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी प्रकल्प आराखडा तयार केला. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने या प्रकल्प आराखड्याला मान्यता दिली होती. त्यानंतर महापालिकेने या प्रकल्पासाठी ४४३ कोटी ५१ लाख १० हजार १५२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. कंत्राटदारांना १८ डिसेंबरपर्यंत निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी सर्व प्रशासकीय, तांत्रिक मान्यता आणि निधीची उपलब्धता करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत निधी उपलब्ध झाला आहे. नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा अंतिम करताना दोन ठिकाणी ६० एमएलडी क्षमतेचे मैलाशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. तसेच, प्रदूषण नियंत्रण, पूर नियंत्रण आणि नदीकाठ सुशोभीकरणाच्या कामांचा या निविदेत समावेश आहे.  - संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri Chinchwad: ₹443 Crore Tender for Indrayani River Improvement Project

Web Summary : Pimpri-Chinchwad speeds up Indrayani River project. A ₹443 crore tender issued for pollution, flood control, sewage treatment, and beautification. The project aims to rejuvenate the sacred river.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडriverनदीpollutionप्रदूषणMaharashtraमहाराष्ट्र