शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचे आऊटसोर्सिंगविरोधी विधेयक पुण्यातील आयटी क्षेत्राच्या मुळावर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:20 IST

- अमेरिकेत देशाबाहेरील कंपन्यांकडून सेवा घेण्यावर निर्बंध : अतिरिक्त कराचा बोजा, आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती;भारतीय कंपन्यांसोबतचे करार धोक्यात

- गोविंद बर्गे

पिंपरी : अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगविरोधी विधेयकामुळे पुण्यातील आयटी क्षेत्रात चिंता वाढली आहे. या विधेयकात देशाबाहेरील कंपन्यांकडून सेवा घेणाऱ्या अमेरिकन कंपन्यांना ‘बॅड ॲक्टर’ यादीत टाकण्यासह त्यांना शासकीय कर्ज-अनुदानासाठी अपात्र ठरविण्याची तसेच परदेशी सेवांवर २५ टक्के अतिरिक्त कर लावण्याची तरतूद आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्यांच्या करारांवर अवलंबून असलेल्या भारतीय आयटी क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची भीती व्यक्त होत आहे.

हिंजवडीसह परिसरातील आयटीनगरीतील अनेक मोठ्या ते मध्यम आकाराच्या आयटी आणि बीपीओ कंपन्यांचा मुख्य व्यवसाय अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून आहे. या कंपन्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, क्लाऊड, बिग डेटा, कन्सल्टिंग, तसेच आरोग्य व वित्तीय क्षेत्रातील बीपीओ सेवा, डेटा प्रोसेसिंग आणि बॅक-ऑफिस अशा सेवा पुरवितात. त्यामुळे अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगविरोधी धोरणांचा परिणाम थेट या क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.

 आऊटसोर्सिंगचा विषय अधिक गंभीर आहे. काही प्रमाणात नोकऱ्यांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे, पण ती फारशी मोठी नसेल. भारत अजूनही खर्चाच्या बाबतीत फायदेशीर आहे आणि आपल्याकडे आवश्यक कौशल्यही आहे. तथापि, भारतीय आयटी क्षेत्र ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात अमेरिकन कंपन्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या नेतृत्वाने या मुद्द्याकडे प्राधान्याने पाहणे अत्यंत गरजेचे आहे. - पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फोर आयटी एम्प्लाॅइज 

अमेरिकेने व्हिसा नियम कठोर केल्यास भारतीयांना तिथे काम करण्याच्या संधी कमी होऊ शकतात. भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकन ग्राहकांकडून प्रकल्प कमी मिळू शकतात किंवा वाढलेल्या खर्चाच्या दबावाला सामोरे जावे लागू शकते. -सूरज काळोखे, वरिष्ठ सल्लागार, आयटी कंपनी, औंध. अमेरिकेच्या आऊटसोर्सिंगविरोधी विधेयकाचा पुण्यातील आयटी क्षेत्रावर परिणाम होईल. आयटीयन्सच्या नोकऱ्यांवर गंडातर येण्याची भीती आहे. केंद्र सरकारने अमेरिकन कंपन्यांना अधिक सोयीसवलती दिल्या तर त्या कंपन्या भारतातील व्यवसाय सुरू ठेवतील.  -अजिंक्य केवळे, आयटीयन्स, हिंजवडी

 अमेरिकेच्या नव्या धोरणाचा भारतीय आयटी कंपन्यांना मिळणाऱ्या करारांवर प्रत्यक्ष परिणाम होणार असून, रोजगार व व्यावसाय धोक्यात येण्याची भीती आहे. मात्र, अमेरिकेतील काही कंपन्यांची मुख्यालये युरोप किंवा आखाती देशांमध्ये असल्याने त्यांना याचा फटका बसणार नाही. अशा कंपन्यांशी करार केलेल्या भारतीय आयटी कंपन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे दिसते. -राहुल साने, आयटीयन्स, हिंजवडी 

टॅग्स :PuneपुणेITमाहिती तंत्रज्ञानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र