शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

निगडी-चाकण मेट्रो मार्गात उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर काढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:52 IST

- लोकप्रतिनिधींची मागणी : भक्ती-शक्ती ते चाकण मेट्रो प्रकल्प अहवालावर बैठक आणि चर्चा

पिंपरी : निगडी ते चाकण मेट्रो मार्ग नाशिक फाटा-भोसरी अशी करा. त्यात भोसरीतील सध्याचा उड्डाण पूल अडथळा ठरत असेल तर तो काढून घ्या आणि गोडाऊन चौक ते चाकण या मार्गाप्रमाणेच एकसारखी रचना नाशिक फाटा ते चाकणपर्यंत करा. भुजबळ चौक वाकड येथील दोन्ही मेट्रो मार्गाची रचना प्रवाशांना सोईस्कर असावी, ⁠मेट्रो स्टेशनच्या जवळपास पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, या विषयांवर मेट्रो कार्यालयात चर्चा करण्यात आली.पिंपरी-चिंचवड शहरातील प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महा-मेट्रोकडून सोमवारी (दि.१) सादर करण्यात आला. यानंतर शहरातील लोकप्रतिनिधी व पुणे महा मेट्रोच्या अधिकाऱ्यासमवेत फुगेवाडी येथील मेट्रो कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीस विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त शेखर सिंह, एनएचआयचे प्रकल्प संचालक संजय कदम, महामेट्रो संचालक अतुल गाडगीळ, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता बापू गायकवाड, सुनील पवार, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, माजी स्थायी समिती सभापती सीमा सावळे, माजी नगर सदस्य राहुल कलाटे, शत्रुघ्न काटे, सचिन चिखले उपस्थित होते. 

आठ दिवसांत पाहणी करून सर्वेक्षण अहवाल देऊ : हर्डीकरया बैठकीत भक्ती शक्ती चौक–मुकाई चौक, किवळे– भुजबळ चौक, वाकड- साई चौक, जगताप डेअरी – कोकणे चौक, नाशिक फाटा – संत तुकारामनगर चौक, गवळी माथा चौक, भोसरी डिस्ट्रिक सेंटर, गोडाऊन चौक – चाकण या महत्त्वाच्या मार्गांच्या प्रकल्प अहवालावर चर्चा करण्यात आली, तसेच त्यासाठी सर्व्हे आणि डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून येत्या आठ दिवसांत पाहणी करून सर्वेक्षण व अहवाल तयार करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो