पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. ‘पिंपरी-चिंचवडमधील भ्रष्टाचाराच्या ‘आका’ला संपवायचे आहे,’ असे विधान पवारांनी केल्यानंतर, बुधवारी आमदार लांडगे यांनी प्रत्युत्तर देत अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ असल्याचा आरोप केला आहे.
महेश लांडगे यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना म्हणाले की, सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणारे अजित पवार हेच राज्यातील भ्रष्टाचाराचे ‘आका’ आहेत. आम्हीही पुराव्यानिशी आरोप करू, पण ते आरोप त्यांना सहन होणार नाहीत.
ते म्हणाले की, उमेदवारी मागायला कोणी येत नसल्यामुळे पवार चिडचिड करत आहेत. चिठ्ठी वाचून स्क्रिप्टेड भाषण करणे ही त्यांची सवय आहे. त्यांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत. ते १९९१ पासून येथील राजकारणात आहेत. ते कायम सत्तेत राहिले. मात्र त्यांनी उंटावर बसून शेळ्या हाकण्याचेच काम केले. माझ्या संपत्तीवर बोलण्याऐवजी त्यांनी स्वतःची जुनी आणि सध्याची परिस्थिती पाहावी. त्यांनी नेहमीच स्थानिक नेतृत्व डावलले. कोणालाही मोठे होऊ दिले नाही. सध्या राष्ट्रवादीची अवस्था बिकट असून त्यांना १२८ उमेदवारही मिळाले नाहीत.
भ्रष्टाचार लपवण्यासाठीच भाजपसोबत?
आमदार लांडगे म्हणाले की, शरद पवारांमुळेच अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले आणि त्यांची ओळख निर्माण झाली. आज तेच शरद पवारांना सोडून भाजपसोबत आले आहेत. भ्रष्टाचार लपवण्यासाठीच ते भाजपसोबत आले आहेत का?
Web Summary : Pimpri-Chinchwad election heats up as Landge accuses Ajit Pawar of being Maharashtra's corruption 'kingpin,' citing a 70,000 crore scam. He claims Pawar's BJP alliance is to hide corruption.
Web Summary : पिंपरी-चिंचवड चुनाव में लांडगे ने अजित पवार पर महाराष्ट्र में भ्रष्टाचार का 'सरगना' होने का आरोप लगाया, 70,000 करोड़ के घोटाले का हवाला दिया। उन्होंने दावा किया कि पवार का भाजपा गठबंधन भ्रष्टाचार छिपाने के लिए है।