शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

bomb threat : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल

By नारायण बडगुजर | Updated: March 11, 2025 14:54 IST

- महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला.

पिंपरी : आकुर्डी येथील डी. वाय. पाटील महाविद्यालयामध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने खळबळ उडाली. महाविद्यालय प्रशासनाला मंगळवारी (दि. ११) सकाळी साडेआठच्या सुमारास हा ई-मेल मिळाला. त्यानंतर पोलिसांच्या बॉम्ब शोधक/नाशक पथक (बीडीडीएस) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण महाविद्यालयात पाहणी करण्यात आली. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने हा ‘ई-मेल’ खोटा असल्याचे निष्पन्न झाले. 

रावेतचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन फटांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात दाखल झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली.पोलिसांनी तत्काळ संपूर्ण महाविद्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेर बाहेर काढून महाविद्यालय व परिसरात तपासणी सुरू केली. त्यामुळे अफवांना उधाण आले. पालकांनीही महाविद्यालयाकडे धाव घेतली. पोलिसांच्या बॉम्ब शोध पथक आणि सायबर सेलच्या मदतीने महाविद्यालय परिसराची तपासणी केली.  

यापूर्वीही फेक ई-मेल

पिंपरी-चिंचवड तसेच पुणे शहरातील शाळा, महाविद्यालय आणि रुग्णालयांना यापूर्वीही अशा स्वरूपाचे धमकीचे मेल मिळाले आहेत. त्यावेळीही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकांना सूचना करण्यात आली आहे.ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू

पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे. अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याPoliceपोलिसArrestअटक