शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad: महापालिका रुग्णालयांत बिल घोटाळा; कर्मचाऱ्यांनीच केला लाखोंचा अपहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2026 15:05 IST

- आकुर्डी व भोसरी रुग्णालयांत ‘कार्बन कॉपी ट्रिक’ने फसवणूक : चौकशी सुरू; गोरगरीब रुग्णांचे आर्थिक शोषण; कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर संश असून, नोटिसा बजावल्या

पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या बिलात गंभीर गैरव्यवहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखवून कार्बन कॉपीवर कमी रक्कम नोंदवून लाखो रुपये लाटले गेले आहेत. आकुर्डीतील हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात हा प्रकार समोर आला असून, याची चौकशी सुरू झाली आहे.

महापालिकेच्या आठ मोठ्या रुग्णालयांसह ३० दवाखान्यांतून गोरगरीब रुग्णांना उपचार मिळतात. आकुर्डी रुग्णालयात प्रथम हे उघड झाले. रुग्णांना १०० रुपयांचे बिल दिले असल्यास कार्बन कॉपीवर फक्त २५ रुपये दाखवून उर्वरित रक्कम खिशात घातली जात होती. अशा प्रकारे दररोज छोट्या-छोट्या रकमांमधून सुमारे नऊ लाख २५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले. रुग्णालय प्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर वैद्यकीय विभागाला अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर सर्व रुग्णालयांची तपासणी केली असता भोसरी रुग्णालयातही असाच प्रकार आढळला. तेथेही लाखोंचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रकरणात आकुर्डी रुग्णालयात कायमस्वरूपी कर्मचारी आणि तीन कंत्राटी कर्मचारी संशयित असून, त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि जिजामाता रुग्णालयातही असे गैरव्यवहार उघडकीस आले होते. तरीही इतर ठिकाणी हे सुरू राहिले. या प्रकारामुळे महापालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तातडीने पारदर्शक ऑनलाइन बिलिंग सुरू करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

 ऑनलाइन बिलिंग यंत्रणा कधी?

रोख व्यवहार आणि पेपर बिलिंगमुळे गैरसुविधा होत असून, रुग्ण व नातेवाईक संतप्त आहेत. महापालिकेत १ एप्रिल २०२५ पासून पेपरलेस कारभार सुरू असला तरी रुग्णालयांत अद्याप ऑनलाइन बिलिंग व पेमेंट सुरू झालेले नाही. यामुळे कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाइकांमध्ये वारंवार वाद होतात.

आकुर्डी व भोसरी रुग्णालयांत बिल अफरातफर उघडकीस आली आहे. सर्व रुग्णालयांची तपासणी केली असून, चौकशी अहवाल सामान्य प्रशासन विभागाला सादर केला जाईल. दोषी कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल. लवकरच सर्व रुग्णालयांत ऑनलाइन व्यवहार सुरू होतील.  - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका  

एका रुग्णाची दोन बिले होती. त्यातील फक्त एकच भरले गेले. आम्ही त्याला उर्वरित रक्कम भरण्यास सांगितले आणि पावत्या तपासल्या, तेव्हा आम्हाला बिलिंगमध्ये तफावत आढळून आली. याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. - डॉ. बाळासाहेब होडगर, प्रमुख, हभप प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad Hospitals Face Bill Scam; Employees Embezzle Lakhs

Web Summary : Pimpri-Chinchwad hospital staff embezzled lakhs by manipulating patient bills. Discrepancies in Akurdi and Bhosari hospitals revealed the scam. An inquiry is underway, demanding online billing and strict action against culprits.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड