शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pimpari-chinchwad : स्थायी समितीची माळ कोणाच्या गळ्यात; ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवणार?

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: February 20, 2026 09:42 IST

- महापालिकेच्या आजच्या सभेकडे शहराचे लक्ष : सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग; स्थानिकांच्या प्रस्तावाला डावलून प्रदेश पातळीवरून वेगळेच नाव येण्याची शक्यता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती अध्यक्षांसह विविध विषय समित्यांची घोषणा होणार असल्याने सत्ताधारी भाजपमध्ये पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. विशेषतः कोट्यवधीच्या विकासकामांना मंजुरी देणाऱ्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘एक व्यक्ती एक पद’ फॉर्म्युला राबवला गेल्यास प्रदेश पातळीवरून वेगळेच नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प लवकरच सादर होणार असून, त्याआधी स्थायी समिती अध्यक्षाची निवड महत्त्वाची ठरणार आहे. रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, स्मार्ट सिटीतील अपूर्ण प्रकल्प, तसेच प्रभागांतील प्रलंबित कामांवर शिक्कामोर्तब करण्याचा अधिकार स्थायी समितीकडे असल्याने या पदाला विशेष महत्त्व आहे. अध्यक्षपदी कोणाची निवड होते, यावर पुढील वर्षातील विकासकामांची दिशा अवलंबून राहणार आहे.

स्थायी समितीचे अध्यक्षपद आपल्याच समर्थकाला मिळावे, यासाठी भाजपचे चारही आमदार प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. पक्षातील विरोधकांना समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळू नये, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. या सभेत केवळ समित्यांची घोषणा होणार नसून, सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत शक्ती-संतुलन दिसून येणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाचा फैसला केवळ पदनियुक्ती न राहता, शहरातील राजकीय समीकरणांना आकार देणारा ठरणार आहे.----

नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचारभाजपमध्ये ‘एक पद, एक व्यक्ती’ हा फॉर्म्युला लागू असल्याने शहराध्यक्ष बापू काटे आणि शैलजा मोरे, राहुल जाधव यांची नावे मागे पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नुकतेच पक्षात दाखल झालेले राहुल कलाटे यांचे नाव चर्चेत असले, तरी स्थानिक पदाधिकाऱ्यांचा त्यांना विरोध असल्याचे बोलले जाते. प्रभाग पातळीवरील गटबाजी आणि जुन्या-नव्यांच्या संघर्षामुळे त्यांच्या दावेदारीबाबत संभ्रम आहे. पक्षाचे निष्ठावंत शीतल शिंदे यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर झाले होते; मात्र त्यांनी ते पद नाकारल्याने त्यांना स्थायी अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता धूसर मानली जाते. दुसरीकडे स्नेहा कलाटे, अभिषेक बारणे आणि सुप्रिया चांदगुडे या नव्या चेहऱ्यांची नावे आघाडीवर आहेत. राज्य पातळीवरील संपर्क, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि पुढील निवडणुकीच्या दृष्टीने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.महापौर, गटनेते निवडीवेळी धक्का

महापौर निवडीवेळी रवी लांडगे यांचे नाव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे केल्याची चर्चा झाली होती. गटनेते प्रशांत शितोळे यांची निवडही प्रदेश पातळीवरून झाली. उपमहापौरपदही शर्मिला बाबर यांना ऐनवेळी देण्यात आले. त्यामुळे स्थानिक आमदारांना डावलून काही निर्णय होत असल्याची नाराजी आडून-आडून व्यक्त होत आहे. त्याची पुनरावृत्ती स्थायी समितीच्या अध्यक्ष निवडीतही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pimpri-Chinchwad: Who will head the Standing Committee? One person, one post?

Web Summary : Pimpri-Chinchwad BJP anticipates intense competition for Standing Committee head. 'One person, one post' formula may introduce unexpected candidate. Factionalism and new faces complicate the decision.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६