PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 06:41 PM2023-12-22T18:41:11+5:302023-12-22T18:43:30+5:30

प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्यावर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत

PIFF Festival start from January 18 to 25 Enjoy watching over 140 movies from 51 countries | PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

PIFF महोत्सव १८ ते २५ जानेवारीदरम्यान; ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी

पुणे : जगभरातील ५१ देशांतील १४० हून अधिक चित्रपट पाहण्याची पर्वणी चित्रपट रसिकांना देणारा पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १८ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान होणार आहे.

महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागामध्ये १४ चित्रपटांची निवड करण्यात आली असून ‘चित्रपट एक आशा’ (सिनेमा इज अ होप) हे यंदाच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र आहे. महोत्सवासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया शुक्रवार (दि.२३) डिसेंबर www.piffindia.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार असून, चित्रपटगृहांवर नाेंदणी प्रक्रिया (दि.५) जानेवारीपासून सुरू होणार आहे.

महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर आयकॉन (सहा पडदे), लष्कर परिसरातील आयनॉक्स (तीन पडदे) आणि औंध भागातील वेस्टएंड मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात (दोन पडदे) या तीन ठिकाणी दाखविले जाणार आहेत. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद पाहता, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक दोन चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते यावेळी उपस्थित होते.

जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपट

अ सेन्सेटीव्ह पर्सन (दिग्दर्शक - तोमास क्लेन, झेक रिपब्लिक, स्लोव्हाक रिपब्लिक)
ब्लागाज लेसन्स (दिग्दर्शक - स्टीफन कोमांदरेव्ह, बल्गेरिया, जर्मनी)
सिटीझन सेंट (दिग्दर्शक - तिनातीन कजरिशविली, जॉर्जिया, बल्गेरिया, फ्रान्स)
फ्लाय ऑन (दिग्दर्शक - ताकुया कातो, जपान)
हिअर (दिग्दर्शक - बास दिओस, बेल्जियम)
ओशन आर द रिअल कॉन्टिनेंटस् (दिग्दर्शक - तोमासो सांताम्ब्रिजिओ, क्युबा, इटली)
पुआन (दिग्दर्शक - मारिया अल्शे, बेंजामिन नाईश्टॅट, अर्जेनटिना, इटली,
फ्रान्स, जर्मनी, ब्राझिल)
शल्मासेल (दिग्दर्शक - सिल्क एन्डर्स, जर्मनी)
टेरिस्टेरीयल व्हर्सेस (दिग्दर्शक - अलीरेझा खतामी, अली असगरी, इराण)
द बर्डन (दिग्दर्शक - अमर गमाल, येमेन, सुदान, सौदी अरेबिया)
द ड्रीमर (दिग्दर्शक - अनाईस टेलेने, फ्रान्स)
द सेन्टेन्स (दिग्दर्शक - फ्राजिल रझाक, मल्याळम, भारत)
टोल (दिग्दर्शक - कॅरोलिना मार्कोविझ, ब्राझिल, पोर्तुगाल)
टुमारो इज अ लॉंग टाईम (दिग्दर्शक - ज्यो झी वी, सिंगापोर, तैवान,
फ्रान्स, पोर्तुगाल)

Web Title: PIFF Festival start from January 18 to 25 Enjoy watching over 140 movies from 51 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.