निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट
By Admin | Updated: October 1, 2014 00:51 IST2014-10-01T00:51:12+5:302014-10-01T00:51:12+5:30
निवडणुक रिंगणातून माघारी घेण्यासाठी बुधवारी(दि. 1) दुपारी तीनर्पयत मुदत आहे. निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम नावे उद्या संध्याकाळर्पयत स्पष्ट होणार असून, त्यानंतर खरी रंगत चढणार आहे.

निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट
>पिंपरी : निवडणुक रिंगणातून माघारी घेण्यासाठी बुधवारी(दि. 1) दुपारी तीनर्पयत मुदत आहे. निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम नावे उद्या संध्याकाळर्पयत स्पष्ट होणार असून, त्यानंतर खरी रंगत चढणार आहे.
जिल्ह्यातील 21 मतदारसंघात 561 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होती. त्यातील 78 उमेदवारांचे अर्ज छानणीत बाद झाले आहेत. राष्ट्रीय व राज्य पक्षांच्या उमेदवारांना आणि अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप उद्या, बुधवारी दुपारी तीननंतर केले जाणार आहे. राजकीय पक्षांसाठी एकूण 8 चिन्हे राखीव असून, अपक्षांसाठी वेगवेगळ्या प्रकाराची तब्बल 85 मुक्त चिन्हे आहेत.
इच्छुकांकडून अर्जवाटप व स्वीकृती 2क् ते 27 सप्टेंबर या कालावधीत झाली. बुधवारी प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयात चिन्हवाटप होणार
आहे. अपक्षांसाठी एकूण 85 मुक्तचिन्हे आहेत. दैनंदिन वापरातील वस्तू आणि खेळ साहित्यातील वस्तूचे हे चिन्ह आहे. (प्रतिनिधी)
अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस
पिंपरी : अर्ज भरलेल्या इच्छुकांना आज मंगळवारी अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली. बुधवारी दुपारी तीनर्पयत अर्ज मागे घेता येणार आहेत. दि. 2क् ते 27 सप्टेंबर या कालावधीत अनेक इच्छुकांनी अर्ज भरले. त्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रत कार्यरत असलेल्या इच्छुकांची संख्या अधिक आहे. मोठय़ा संख्येने अपक्ष अर्ज भरले गेले आहेत. पक्षाने उमेदवारी नाकारल्याने अनेकांनी बंडाचे निशाण फडकावीत अर्ज भरला आहे. भोसरीत 32, चिंचवडमध्ये 3क्, पिंपरीत 35, मावळात 24 जणांचे अर्ज आहेत. एकूण 121 जण आहेत. उद्या किती जण माघार घेतात याची चर्चा सुरू आहे. माघारीनंतर अंतिम यादी तयार होईल. यावरून राजकीय समीकरणो बांधणो सुलभ होईल. उमेदवारांच्या संख्येवरून ईव्हीएम मशिनची संख्या ठरणार आहे. एका मशिनमध्ये किमान 15 उमेदवारांच्या नावाचा समावेश करता येतो. एका यंत्रवर साधारणत: 16 जणांना मतदान करता येते. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ‘नोटा’ हा एक पर्याय दिला आहे. त्यामुळे 15 उमेवार आणि 1 नोटा असे मतदान करता येते.