पिकअपची मोटारसायकलला धडक, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:04+5:302021-04-25T04:09:04+5:30

या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव राम नानाभाऊ वाघमारे (वय ४८ रा. ओतूर) असे आहे. या अपघातास ...

The pickup hit the motorcycle, killing one | पिकअपची मोटारसायकलला धडक, एक ठार

पिकअपची मोटारसायकलला धडक, एक ठार

या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव राम नानाभाऊ वाघमारे (वय ४८ रा. ओतूर) असे आहे. या अपघातास कारणीभूत असणारा पिकअप चालक यांचे विरोधात ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ओतूर पोलिसांनी ही फिर्याद दाखल करून घेतली आहे .

अपघातात ठार झालेले राम वाघमारे हे ओतूर मार्केटमध्ये हमालीचा व्यवसाय करतात. दि. २३ एप्रिल रोजी सायंकाळी त्यांच्या घरातून डुंबरवाडी येथे कांदा पाहण्यासाठी मोटारसायकल (एमएच १७ बीबी ६२२८) ने ओतूरकडून नगर-कल्याण मार्गाने डुंबरवाडीकडे जात होते. त्याचवेळी आळेफाट्याकडून ओतूरच्या दिशेने चुकीच्या बाजूने पिकअप (एमएच १२ केपी ७५१) येऊन मोटारसायकलला धडक दिली. त्यात राम वाघमारे ठार झाले. पिकअप व चालक संदीप चौधरी ताब्यात घेतले आहे. ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक मोरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Web Title: The pickup hit the motorcycle, killing one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.