शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 18:42 IST

- आराखडा तयार करून गुरुवारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमधील ओढे-नाले आणि पावसाळी पाण्याचे नैसर्गिक प्रवाह मोकळे करण्यासाठी अनधिकृत बांधकामे पाडा, त्याबाबत एक महिन्याचा आराखडा तयार करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि इतर विभागांना दिले. त्यानुसार गुरुवारपासून अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात येणार आहे.हिंजवडी आयटी पार्कमध्ये अजित पवार यांनी रविवारी (दि. १३ जुलै) सकाळी पाहणी केली. त्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) आकुर्डी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आढावा बैठक झाली. त्यावेळी अजित पवार यांनी हे निर्देश दिले. आमदार शंकर मांडेकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, सह पोलिस आयुक्त शशिकांत महावरकर, रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, मनोज पाटील, पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्याधिकारी विजय राठोड उपस्थित होते.डाॅ. योगेश म्हसे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्क परिसरात ओढ-नाले अरुंद झाले आहेत, तसेच काही ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे अशा अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येईल. दररोज किती बांधकामांवर कारवाई करणार आणि कोणत्या दिवशी किती बांधकामे पाडली, याबाबत हा आराखडा राहणार आहे. त्याअंतर्गत हिंजवडी, माण, मारुंजी या परिसरातील अनधिकृत बांधकामांवर महिनाभरात कारवाई करण्यात येणार आहे. नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह कोणी बदलला, बांधकामास कोणी परवानगी दिली याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

‘नवीन रस्त्यांची आखणी करा’हिंजवडी भागात केलेल्या उपाययोजनांच्या अनुषंगाने तसेच रिंगरोडच्या कामाबाबत डॉ. म्हसे यांनी बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आराखड्यातील रस्ते तसेच नवीन रस्त्याची आखणी करत यासंबंधी तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश पवार यांनी दिले.

प्रस्तावित रस्त्यांच्या निविदा काढणार

हिंजवडी आयटी पार्क परिसरात पीएमआरडीएतर्फे रस्ते प्रस्तावित आहेत. त्यांच्या कामांच्या निविदा लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील. सर्व रस्ते काँक्रीटचे होतील, अशी माहिती डाॅ. म्हसे यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवार