शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पश्चिम घाटाच्या पठारावर फुलतेय दुसरे ‘कास’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 01:12 IST

अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्याचे लोट व गार वारा अशा वातावरणात पश्चिम घाटाच्या पठारावर सध्या फुलोत्सव भरला आहे.

भीमाशंकर : अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी, धुक्याचे लोट व गार वारा अशा वातावरणात पश्चिम घाटाच्या पठारावर सध्या फुलोत्सव भरला आहे. साताºयाजवळील कास पठार जसे फुलांसाठी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे भीमाशंकर, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, भंडारा या भागात असलेल्या पठारांवरदेखील रंगीबेरंगी फुलांनी माळ भरून गेले आहेत. कास पठारावर जायला जरी जमले नाही, तरी ही निरनिराळी फुले पाहण्यासाठी पश्चिम घाटातील पठारांना जरून भेट द्या.पश्चिम किनारपट्टीला लागून पश्चिम घाट पसरला आहे. युनेस्कोने जागतिक जैववैविध्याचा वारसा म्हणून हे स्थळ सन २०१२मध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. यामध्ये उत्तर-दक्षिण सुमारे १,६०० किलोमीटर पसरलेल्या या रांगेला महाराष्ट्रात सह्याद्री म्हणतात. या पश्चिम घाटात वनस्पतींच्या जवळपास ७,५०० प्रजाती आहेत व या पर्वतरांगांमध्ये अनेक पठारे आहे. यातील सह्याद्रीची पठारे ही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या पठारांवर १५० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती बघायला मिळतात व या प्रजाती प्रामुख्याने गवत वर्गात मोडतात. कास पठार हे त्यातील एक प्रसिद्ध ठिकाण. येथे अतिशय आगळीवेगळी फुले पाहावयास मिळतात. कास पठाराप्रमाणेच अनेक छोटी-मोठी पठारे, कडेकपारी, घाटवाटा सह्याद्रीमध्ये आहेत. खेड, आंबेगाव, जुन्नरबरोबरच नगर जिल्ह्यातील अकोले, भंडाºयापर्यंत पसरलेल्या सह्याद्रीमध्ये कासप्रमाणेच फुलोत्सव पाहायला मिळतो.सह्याद्रीमध्ये हळूहळू फुले बहरू लागली असून, छोट्यामोठ्या पठारांबरोबरच पायवाटा, भातखचरांचे बांध, रस्त्यांच्या कडासुद्धा विविधरंगी फुलांनी सजल्या आहेत. ही फुले अतिशय नाजूक, हळवी, हलकी, छोटीशी, चिमुरडी असली तरी सुंदर दिसतात.यातील सोनकी, तेरडा, कारवी, भारंगी, खरबुटी, कळलावी, हाळिंद, खुरपापणी, कवळा, खांतुडी, नीलकंठ, गेंद, बरका, रानआले, रानहळद, चिचूरकांदा, पंद, चिचुरडी, जांभळी मंजिरी, हिरवी निसुर्डी, धाकटा अडुळसा, कोळिता, ढालतेरडा, पानतेरडा, वेलमूग, दीपकाडी, नरवी अमरी, काटेरिंगणी, अबोलिमा, कुली, खरचुडी, कंदील फूल अशा विविध फुलांचा फुलोत्सव भरला आहे. हा निसर्गाचा ठेवा पाहायचा असेल, तर पश्चिम घाटातील पठारे, डोंगर, पायवाटांकडे या. खूप सारा फुलोत्सव दिसले.या फुलांमधून येणाºया फळांचा तसेच वेलींना खाली जमिनीतअसलेल्या कंदमुळांचा अतिशय औषधी उपयोग आहे. खरबुटी, हाळिंदसारखा फूलवेलीला जमिनीत कंदमूळ असते. हे दमा वशुगर आजारांवर गुणकारी मानले जाते. कळलावी या फुलाच्या वेलीचा उपयोग पूर्वी प्रसूतीच्या कळा येण्यासाठी केला जाई; म्हणून त्याला हे नाव पडले. लाल ज्वालांसारखी ही फुले दिसत असल्यामुळे त्यांना ‘अग्निशिखा’देखील म्हणतात. भारंगीची फुले गुच्छासारखी दिसतात व त्यांचा रंग बहारदार असल्यामुळे त्याला ‘भारंग’ नाव पडले आहे. भारंगीच्या कोवळ्या निळसर फुलांची भाजी करून खाल्ली जाते. पोटदुखीच्या विकाराला ही फुले औषधी समजली जातात.