शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध पत्करून फुले दाम्पत्याने सुरू केली शाळा - सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 12:19 IST

आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी, समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे

पुणे: सात वर्षांची मुलगी रस्त्यावरील खड्ड्यांबाबत समाजमाध्यमांवर बाेलते आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते सुधारण्यासाठी कृती करण्यास सांगते. या कृतीने माझे मन मला पुण्यात १८४८ साली सुरू झालेल्या मुलींच्या पहिल्या शाळेकडे घेऊन जाते. पितृसत्ताक जातीयवाद्यांचा विराेध असतानाही महात्मा जाेतीराव फुले, सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सर्व जाती-धर्मातील लाेकांना शिक्षण मिळावे यासाठी निर्धाराने काम केले, असे प्रतिपादन सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी केले.

मुलींना शिकविण्यासाठी सावित्रीबाई फुले शाळेत जात असत तेव्हा त्या दुसरी साडी जवळ ठेवत असत. कारण मुलींना त्या शिकवतात म्हणून रस्त्यात गावकरी त्यांच्या अंगावर कचरा फेकायचे. समाजाला सुशिक्षित करण्याचा १८४८ ते २०२३ चा प्रवास प्रचंड संघर्ष, प्रगती आणि नि:स्वार्थ लाेकांच्या कार्याचा आहे, असेही ते म्हणाले.

सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड) विद्यापीठाच्या २० व्या पदवी प्रदान साेहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार, प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, विद्यापीठाचे प्रो-होस्ट डॉ.राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यापीठातर्फे ८६ विद्यार्थ्यांना पीएच.डी, १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक तसेच ८ हजार ५७९ विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

दुसऱ्यांचे ऐकून न घेणे ही माेठी समस्या 

आपण केवळ स्वत:चे ऐकत असताे, दुसऱ्याचे न ऐकणे ही आपल्या समाजाची खूप माेठी समस्या आहे. तुमच्याकडे याेग्य उत्तरे नसतील तरीही इतरांना ऐकून घेतल्यास सभाेवतालच्या जगाची नवीन समज आपल्याला मिळत असते, असेही मत सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...

- आजची युवा पिढी दयाळू, सहानुभूती असणारी तसेच गंभीरपणे विचार करणारी आहे. समस्यांबाबत बाेलणारी आणि इतरांना शिक्षित करणारी आहे.- आयुष्यात यश मिळविण्यासाठी मेहनत घेण्यासह विद्यार्थ्यांनी त्यांना याेग्य वाटते ते करावे. स्वत्त्वाची जाणीव ठेवा; पण स्वत:बद्दल कठाेर हाेऊ नका. सभाेवतालच्या लाेकांबद्दल ममत्वभाव ठेवा.- तुम्ही जी पदवी घेतली आहे, त्याबाहेरही करिअरची संधी शाेधता येईल. करिअर निवडणे आता गुंतागुंतीचे राहिले नाही. युवकांनी नावीन्यपूर्ण, कल्पक आणि धाडसी निर्णय घ्यावे.- नेहमीची वाट साेडून ज्या वाटेवर पूर्वी काेणी गेले नाही असे नवीन आणि अज्ञात मार्ग शाेधा. अपयशाला न घाबरता भिडले पाहिजे.- लाेकप्रियता आणि वैयक्तिक प्रगती यावर यशाचे माेजमाप करू नका. उच्च ध्येयासक्ती, देशसेवा करणे आवश्यक आहे.- ग्राहकांना मदत करणे, कामाच्या ठिकाणी दर्जेदार आणि उत्तम वातावरण निर्मिती, कनिष्ठांना मार्गदर्शन करण्यासह भेदभाव दूर करीत सर्वसमावेशक समुदाय निर्मिती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलEducationशिक्षणSocialसामाजिकsymbiosisसिंबायोसिस