आॅफिसचा फोन अन् मुलीचा हट्ट.. आई, तूच खाऊ घाल!

By Admin | Updated: March 8, 2016 00:51 IST2016-03-08T00:51:34+5:302016-03-08T00:51:34+5:30

आॅफिसला जाण्याची तयारी सुरू असते. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातून महत्त्वाचा फोन येतो. एका मीटिंगसंदर्भांत त्वरित माहिती पाहिजे, नोट्स तयार ठेवा... आलेला कॉल ठेवला आणि दुसरा कॉल लावला

Phone phone or girl's butt .. Mother, you eat! | आॅफिसचा फोन अन् मुलीचा हट्ट.. आई, तूच खाऊ घाल!

आॅफिसचा फोन अन् मुलीचा हट्ट.. आई, तूच खाऊ घाल!

आॅफिसला जाण्याची तयारी सुरू असते. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयातून महत्त्वाचा फोन येतो. एका मीटिंगसंदर्भांत त्वरित माहिती पाहिजे, नोट्स तयार ठेवा... आलेला कॉल ठेवला आणि दुसरा कॉल लावला... अर्धा तासात आॅफिसला या आणि किती ग्रामपंचायतींचे सरपंचपद रिक्त आहेत व कोणत्या तारखांना निवडणुका लावल्या आहेत, या माहितीची सविस्तर नोट तयार करा.. मी पोहचते साडेदहापर्यंत...हे सर्व सुरू असताना एक वर्षाची मुलगी आश्लेषा पायात घुटमळत असते... आई खाऊ.. आई खाऊ... मुलीचा खाऊ घालण्याचा हट्ट त्यांना पूर्ण करावा लागतो... मुलींना खाऊ घालत असतानाच घरात अश्लेषाला सांभळण्यासाठी असलेल्या मुलीला दुपरी हा खाऊ दे.. आजीला औषधे घेण्याची आठवण कर... संध्याकाळसाठी भाजी निवडून ठेव या सूचना चालू होत्या....
जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसाधारण शाखेच्या प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे या एकाच वेळी सक्षम अधिकारी, आई व गृहीणी या सर्व भूमिका कशा पार पडताता हा प्रत्यक्ष त्यांचा सोबत राहूनच अनुभव घेण्यात आला. एक मोठा मुलगा, एक वर्षाची मुलगी, पती आणि सासू-सासरे असा रोहिणी आखाडे यांचा परिवार. आखाडे मॅडमचा दिवस सकाळी ६ वाजता सुरू होता. मुलगा आयुष सात-साडेसात वाजता शाळेत जातो.
त्यामुळे त्यांच्या नाष्ट्याची तयारी, याच वेळी पाणी येत... सध्या पाणी कपात सुरू असल्याने दोन तासच पाणी येत म्हणून सर्वांनाच लवकर उठून पाणी येण्यापूर्वीच आंघोळी कराव्या लागता.
लगेच वॉशिंग मशिन लावायाची, या गडबडीत मुलाला टिफीन देणे शक्य नसल्याने शाळेतच हेल्थ सेंटराचा टिफीन लावला. त्यानंतर स्वयंपाक, आॅफिसच्या कपड्यांना प्रेस करणे, आॅफिसमध्ये मिटींग असल्याने साडी घालावी लागते. याता पंधरा मिनिट जातात.
> आजची सुपरवूमन
एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळख असतानाही घरातील कामेही तितक्याच यशस्वीपणे सांभाळणाऱ्या शीतल बियाणी म्हणजे स्त्रीमधील गुणांची खऱ्या अर्थाने ओळख करुन देणारे व्यक्तिमत्त्व.
ज्वेलरी व कॉश्चुम डिझायनिंगसारख्या सृजनशील जगात वावरत असताना स्वत:ची दुकाने संभाळणे आणि याचवेळी घरातील सगळ््या गोष्टींचे योग्य पद्धतीने नियोजन करणे म्हणजे एका धडाडीच्या महिलेची कसरत त्यांच्या धावपळीतून दिसून येते. दुकानांमधील कामांमुळे रात्री कितीही उशीर झाला तरी सकाळी न चुकता व्यायामाला जाणाऱ्या बियाणी आल्यावर पटापट घरातील कामे करतात. एकीकडे स्वत:चे आवरत असतानाच डोक्यात दिवसभराच्या व्यवसायातील कामांचे विचार फीरत असतात, तर दुसरीकडे आज कोणती भाजी करायची, कामाला येणाऱ्या बायकांना काय करायला सांगायचे याचे चक्र चालू असते.
> थँकलेस जॉब...
खूप दमल्याने तिला नेहमीपेक्षा उशिरा जाग आली... एरवी विद्यार्थ्यांना ‘टाईम मॅनेजमेंट’चे धडे देणाऱ्या शिक्षिकेचे वेळेत सेट केलेले गणित थोडेसे चुकले... आणि ६.३० वाजता जाग आल्याने आता सगळ्याच गोष्टीला उशीर होणार या भितीने तिला जरा टेंशनच आले... दररोज ७.२५ ला घर सोडावे लागणार असल्याने मुलाचा डबा, स्वयंपाक... स्वत:ला आवरणे... या गोष्टी कशा होणार या विचारात जराही वेळ न दवडता ती झटपट कामाला लागली.... एकीकडे मुलाला आंघोळ घालणे.. पोळ्या-भाजी करणे.. त्याचे दप्तर भरणे अशी सगळी कामे ती एकाच वेळी करीत होती...नंदिता कुसूरकर असे या शिक्षिकेचे नाव...$$्दिमछाक करीत या शिक्षिकेने सर्व कामे लिलया केली... आणि वेळेत घर सोडण्यात यशस्वी ठरली... जमेची बाजू ही होती की नवराही हाताला हात लावून तिच्या प्रयत्नांना साथ देत होता. यालाच कदाचित ‘सुपरमॉम’ म्हणतही असतील... पण तारेवरची तिची कसरत चुकली नाही... मात्र शाळेत गेल्यावर गृहिणीच्या भूमिकेमधून शिक्षिकेच्या रूपात ती कधी परावर्तित झाली हे तिचे तिलाही उमगले नाही...
हे केवळ एक महिलाच करू शकते, हे तिच्याकडे पाहून जाणवले.. मुलांच्या गलबलाटात.. त्यांच्यावर संस्काराची मूल्ये रूजविताना गृहिणीचा अभिनिवेश नकळतपणे गळून पडला. आणि उरला तो फक्त शिक्षक-विद्यार्थी नात्याचा संवादात्मक प्रवास... रोज हा प्रवास जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनच जणू तिला देऊन जातो... शाळा सुटल्यावर पुन्हा एकदा ‘गृहिणी’च्या भूमिकेत तिचा प्रवेश होतो. घरी गेल्यावर शाळेची तयारी करणे... रात्री भाज्या चिरून ठेवणे.. मुलाचा अभ्यास घेणे... या गोष्टी तिला चुकत नाही.. यातून तिची कधीच सुटका होत नाही... अशावेळी गरज असते ती कुटुंबाच्या मानसिक आधाराची.
नोकरी आणि घर सांभाळताना होणाऱ्या दमछाकीनंतरही तक्रारींचा पाढा न वाचता उगवणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी अनुभवण्याची उर्मी देऊन जात असल्याचे नंदिता सांगते.

Web Title: Phone phone or girl's butt .. Mother, you eat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.