शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फडके हौद चौकातील मेट्रो स्थानकाचे स्थलांतर : बाधितांचे पुनर्वसन टळले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 07:00 IST

फडके हौद चौकात मेट्रोचे भुयारी स्थानक असणार होते. त्या स्थानकातून वर रस्त्यावर येण्याजाण्यासाठी म्हणून महामेट्रोला जागा हवी होती.

ठळक मुद्देमेट्रोच्या कामाचा कोणाही नागरिकांना त्रास होऊ नये अशीच महामेट्रोची इच्छानव्या तंत्रज्ञानाने स्थानकाची जागा भुयारात तयार केली जाणार

पुणे: कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गातील फडके हौद चौकातील मेट्रो स्थानकाची जागा अखेर तेथील बाधीतांच्या मागणीनंतर बदलण्यात आली आहे. आता हे स्थानक त्याच चौकापासून थोडे मागे असलेल्या पालिकेच्या एका शाळेच्या जागेत करण्यात येईल. फडके हौद चौकातील जागा बदलण्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनीच दिली. मेट्रोच्या कामाचा कोणाही नागरिकांना त्रास होऊ नये अशीच महामेट्रोची इच्छा आहे. तेथील २४८ बाधितांचे महामेट्रो त्यांच्या सांगण्यानुसार पुनर्वसन करणार होती, मात्र त्यांचा ठाम नकार लक्षात घेऊन आता स्थानकाची जागाच बदलण्यात आली आहे असे ते म्हणाले. या बाधितांचे पुनर्वसन पालिकेच्या ज्या शाळेच्या जागेवर करण्यात येणार होते, तिथेच आता स्थानक असेल. जागा पालिकेची आहे, त्यामुळे मेट्रोच्या खर्चात बचत झाली आहे असा दावाही दीक्षित यांनी केला. फडके हौद चौकात मेट्रोचे भुयारी स्थानक असणार होते. त्या स्थानकातून वर रस्त्यावर येण्याजाण्यासाठी म्हणून महामेट्रोला जागा हवी होती. त्यासाठी तेथील खासगी जागा मालकांबरोबर संपर्क साधण्यात आला होता. एकूण २४८ कुटुंबे बाधीत होत होती. जागेचे मालक तसेच भाडेकरू यांनाही नुकसान भरपाई देण्याची तयारी महामेट्रोने दर्शवली. त्याजागेपासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या पालिकेच्या शाळेच्या जागेवर नवी इमारत बांधून तिथे या कुटुंबांना खोल्या देण्यात येणार होत्या. काहींना ते मान्य होते तर काहींनी ते अमान्य केले. त्यानंतर या विषयात राजकीय शिरकाव झाला.बाधित कुटुंबांनी एक कृती समिती स्थापन केली. मेट्रोचे स्थानक करण्याला विरोध सुरू केला. घरे देणार नाही, जागा देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. तरीही मेट्रो कडून बोलणी सुरू होती, मात्र ती बाधितांच्या भूमिकेमुळे अयशस्वी होत होती. त्यातच तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा माझा हक्काचा घरातील मतदारसंघ आहे, त्यामुळे मी कोणालाही बेघर होऊ देणार नाही, मेट्रोचे स्थानक तिथेच होईल अशी भूमिका घेतली, मात्र त्यात राजकीय तोटा होण्याचे लक्षात आल्यावर त्यांनीच आता जागा बदलण्याच्या निर्णयास संमती दिली आहे. नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गासंदर्भातील अशाच वादाबाबत बापट यांनीच आगाखान पॅलेससमोरूनच हा मार्ग जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र तिथे आता महामेट्रोने कल्याणीनगर परिसरात कामही सुरू केले आहे. पुर्वी आगाखान पॅलेस च्या समोरून हा मार्ग जात होता. मात्र राष्ट्रीय स्मारकासंबधी असलेल्या निर्णयामुळे या मार्गाला नकार देण्यात आला. कायदाच असल्यामुळे महामेट्रोने सुमारे १ किलोमीटरचा वळसा घेत हा मार्ग कल्याणीनगरमधून पुढे नेण्याचा निर्णय घेतला. .....पालिकेच्या या शाळेच्या जागेचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे तिथे नव्या तंत्रज्ञानाने स्थानकाची जागा भुयारात तयार केली जाईल. म्हणजे जमिनीत आधी सरळ १८ फूट खोलीचे छिद्र घेतले जाईल. त्यानंतर त्या छिद्राचा खालच्या खालीच विस्तार केला जाईल व स्थानकासाठी फलाटाची जागा तयार केली जाईल. प्रवाशांना रस्त्यावर येण्याजाण्यासाठीचा मार्ग करण्यासाठी मात्र ही जागा पुरेशी आहे. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही.ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोgirish bapatगिरीष बापट