कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, "पिफ"ला मिळाली तात्पुरती स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 03:09 PM2021-03-10T15:09:23+5:302021-03-10T15:15:11+5:30

ऑनलाईन पद्धतीने १८ ते २५ मार्च दरम्यान होणार महोत्सव

PF temporarily postponed due to increasing number of corona patients | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, "पिफ"ला मिळाली तात्पुरती स्थगिती

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, "पिफ"ला मिळाली तात्पुरती स्थगिती

Next
ठळक मुद्देजागतिक चित्रपट विभागातील निवडक २६ चित्रपट ऑनलाईन महोत्सवात दाखविण्यात येणार

पुणे: शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याने  पुणे फिल्म फाउंडेशनच्या वतीने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ऑनलाइन पद्धतीने १८ ते २५ मार्च दरम्यान होणार आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

पुणे फाऊंडेशन आयोजित १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ११ ते १८ मार्च दरम्यान होणार होता. शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याने हा  चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येतील. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान होणार आहे. 

डॉ. जब्बार पटेल म्हणाले, पुढील काही दिवसांमध्ये ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे आहे, त्यांना देखील त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी 'पिफ'च्या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच याआधी चित्रपटगृहात होणा-या महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या  प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने होणा-या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल. तर तो बदल देखील करून घेणे शक्य होईल. ज्यांनी या आधीच ऑनलाईन पद्धतीच्या महोत्सवासाठी नोंदणी केली आहे. त्यांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची गरज नाही. दि. १८ ते २५ मार्च दरम्यान केवळ जागतिक चित्रपट विभागातील निवडक २६ चित्रपट ऑनलाईन भरविण्यात येणा-या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे.

Web Title: PF temporarily postponed due to increasing number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.