पुण्यात पेट्रोल 120 च्या घरात; 14 दिवसांत तब्बल 10 रुपयांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:57 IST2022-04-05T18:53:36+5:302022-04-05T18:57:55+5:30
गेल्या 14 दिवसांत पेट्रोलचे डिझेलचे दर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत...

पुण्यात पेट्रोल 120 च्या घरात; 14 दिवसांत तब्बल 10 रुपयांची वाढ
पुणे: मागील दोन आठवड्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वारंवार वाढ होत आहे. गेल्या 14 दिवसांत पेट्रोलचेडिझेलचे दर जवळपास 10 रुपयांनी वाढले आहेत. आजचे शहरातील पेट्रोलचे प्रतिलिटर दर 119.13 रुपये झाले आहेत. तर डिझेलचे प्रतिलिटर दर 101.84 रुपयांवर पोचले आहेत. (price of petrol, Diesel in Pune)
शहरात पावर पेट्रोलचे दर 123.63 प्रतिलिटर झाले आहेत. तर सीएनजीचे प्रतिकिलो दर 62.20 वर गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असल्याने सामान्यांच्या खिश्यावर ताण पडत आहे.
सोमवारी शहरात पेट्रोल 118.29 तर पावर पेट्रोल 122.79 प्रतिलिटर होते. तर कालचे डिझेलचे दर 101.01 प्रतिलिटर होते. सीएनजीचे दर 62.20 प्रतिकिलो होते.