शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

बिघाडामुळे पेठा, पर्वती परिसरातील बत्ती गुल्ल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 20:10 IST

सुमारे ३ लाख वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला.

ठळक मुद्देपर्वती केंद्रात झाला बिघाड : दोन तास विद्युत पुरवठा विस्कळीत

पुणे : महापारेषण कंपनीच्या पर्वती येथील २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने, शहर मध्यवस्तीतील पेठा, सिंहगडरस्ता, पर्वती, धायरी या भागातील तब्बल अडीच लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर दोन तास खंडित होता. तर सुमारे ५० हजार वीजग्राहकांना महावितरणकडून पर्यायी व्यवस्थेतून तत्काळ वीजपुरवठा करण्यात आला. देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे डेक्कन, कोथरुड परिसरातील विद्युत पुरवठा गुरुवारी (दि. १३) दिवसभर विस्कळीत होता. महापारेषणच्या पर्वती उपकेंद्रातील पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरमधे (पीटी) बुधवारी (दि. १२) मध्यरात्रीनंतर १ वाजून २३ मिनिटांनी बिघाड झाला. या बिघाडामुळे ट्रान्सफॉर्मर फुटला. पर्वती उपकेंद्रातून १३२ केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा होतो. बिघाडामुळे विद्युत पुरवठा ठप्प झाल्याने, पर्वतीसोबतच रास्ता पेठ उपकेंद्राचाही वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे सुमारे ३ लाख वीजग्राहकांचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला. त्यामधील सुमारे ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा मध्यरात्री दीडपर्यंत महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांनी तातडीने प्रयत्न करून पर्यायी व्यवस्थेतून उपलब्ध करून दिला.महापारेषणकडून २२० केव्ही पर्वती उपकेंद्रातीलतील नादुरुस्त पोटॅन्शियल ट्रान्सफॉर्मरवरील वीजभार त्याच ठिकाणी अतिरिक्त असलेल्या दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरवर घेण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. मात्र त्यात काही तांत्रिक अडचणी आल्याने दोन तासांचा कालावधी लागला. काम पूर्ण झाल्यानंतर २२० केव्ही पर्वती व १३२ केव्ही रास्तापेठ उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला. त्यानंतर बंद असलेले १३ उपकेंद्र व ३४ वीजवाहिन्यांवरील २ लाख ५० हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा टप्प्या टप्प्याने पहाटे सव्वातीन पर्यंत पूर्ववत करण्यात आला.महापारेषणच्या १३२ केव्ही अतिउच्चदाब वीजवाहिनीची (टॉवर लाईन) उंची वाढविण्याचे काम करण्यात येत असल्याने महापारेषणच्या कोथरूड उपकेंद्राचा वीजपुरवठा गुरुवारी (दि. १३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला होता. कोथरूड, वारजे व डेक्कनमधील बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे शहरमध्यवस्ती, शहराच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील बऱ्याच ठिकाणचा वीज पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला होता. 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊस